![]()
गोदावरी नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप देत अंबड-सातपूरच्या भूगर्भात घातक क्रोमियमचे विष कालवून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या तब्बल १९९ आजी-माजी अधिकाऱ्यांची यादी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. दुसरीकडे, एमपीसीबीने (
.
राजेश पंडित आणि निशिकांत पगारे यांच्या अवमान याचिकांवर न्यायालयाने २७ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्य सरकारला अक्षरशः धारेवर धरले होते. त्यानंतर नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांनी २१ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्रात अधिकाऱ्यांची यादी जोडली आहे. २०१४ आणि २०१८ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे मागवण्यात आली होती. त्यांच्यावरील कारवाईचा अहवालही मागवण्यात आला होता.
६६ उद्योगांना कोणाचा आशीर्वाद याचे उत्तर नाही
‘झीरो लिक्विड डिस्चार्ज’ची अट असतानाही रात्री अंधारात रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या अंबड-सातपूरमधील १४३ इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांवर कोर्टाच्या दणक्यानंतर कारवाईचा बडगा उगारला. यात ६६ उद्योगांवर कारवाई झाली. ३० कारखाने बंदचे आदेश दिले. १० प्रस्तावित निर्देश दिले आहेत. २३ कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. ३ स्वेच्छा बंदीचे आदेश दिले आहेत.