Headlines

खंडाळा बसस्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगचा विळखा:सिग्नल बसवण्याची खंडाला ग्रामस्थांकडून मागणी




वैजापूर तालुक्यातील खंडाळा बसस्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर या वर्दळीच्या महामार्गावर जड वाहनांसह दुचाकी आणि रिक्षा तासंतास अस्ताव्यस्त उभ्या असतात. परिणामी दररोज किरकोळ अपघात घडत असून, शालेय विद्यार्थी, महिला आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. खंडाळा ही मोठी बाजारपेठ असल्याने आसपासच्या १० ते १५ गावांतील नागरिकांचा येथे रोजचा संपर्क असतो. त्यातच वाढत्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासही जागा उरलेली नाही. चौकात सूचना फलक व सिग्नल नसल्याने वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत आहेत. प्रशासनाने या बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करून मुख्य चौकात तातडीने सिग्नल बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बस थांबवण्यासाठी रस्त्यावर जागाच नाही Ãबसस्थानक परिसरात लहान-मोठी वाहने अस्ताव्यस्त उभी असल्याने चालकांना बस थांबवण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे महामार्गावर जिथे जागा मिळेल तिथेच बस थांबवली जाते. लांब उभ्या राहिलेल्या बसपर्यंत धावत जाणे महिला आणि विद्यार्थिनींना शक्य होत नाही, ज्यामुळे मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. -सुभाष बहाळस्कर, ग्रामस्थ, खंडाळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *