Headlines

नियोजनाचा उडाला बोजवारा:रस्त्याचे काम, त्यात आठवडे बाजार; नामपूरमध्ये तीन तास वाहतूक जाम, विक्रेत्यांचे अतिक्रमण, पोलिसांची कमतरता; नागरिक त्रस्त




आठवडे बाजाराचा दिवस, रस्त्याचे सुरू असलेले काँक्रिटीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी अपुरे पोलिस मनुष्यबळ यामुळे सोमवारी (दि. २३) नामपूरच्या शिवमनगर परिसरात वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. दुपारी ३ वाजेपासून सुरू झालेली कोंडी तीन तास कायम राहिली. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्याने परिस्थितीचे गांभीर्य समोर आले. नामपूर बसस्थानक ते आर.के. मंगल कार्यालय या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यातील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यातच सोमवारी आठवडे बाजार असल्याने वाहनांची गर्दी वाढली. फळविक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि हातगाड्यांमुळेही कोंडीत भर पडली. परिणामी, शिवमनगर परिसरात चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे, सटाणा रस्त्यालगत असलेल्या शाळेची सायंकाळी पाच वाजता सुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा फटका बसला. नामपूर दूरक्षेत्रात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बजरंग ग्रुपच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. नामपूर दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब मगरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. ^ रस्त्यावर फळविक्रेते, प्रवासी वाहतूक करणारी वाहने किंवा हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. दादाभाई मगरे, पोलिस उपनिरीक्षक, नामपूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *