Headlines

खड्ड्यांमुळे उसाची ट्रॉली उलटल्याने दुचाकींचे नुकसान:संगम चौक ते शिवस्मारक रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे; नागरिकांचा संताप कायम



करमाळा शहरातील संगम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी रात्

.

संगम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यालगतच बसस्थानक असून, सोलापूर, पुणे, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर तसेच भूम, परंडा आणि बार्शी या भागांतून येणाऱ्या एसटी बसेसची या मार्गावरून सतत ये-जा असते. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा रस्ता असल्याने दिवसभर येथे वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.

सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूकही वाढली आहे. शहरातून होणारी ऊस वाहतूक टाळण्यासाठी बायपास, कुटीर रुग्णालय आणि न्यायालय मार्गे वाहतुकीची व्यवस्था असतानाही काही ट्रॅक्टर शहरातील मुख्य रस्त्यांवरूनच ऊस घेऊन जात असल्याचे चित्र आहे. अशातच संगम चौकातील एका दुकानासमोर खड्ड्यांमुळे उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने अपघात घडला.

या घटनेनंतर रविवारी सकाळी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी मुरूम टाकून खड्डा बुजविला. मात्र, संगम चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतच्या उर्वरित रस्त्याची अवस्था अद्यापही जैसे थे आहे. वाट पाहावी लागणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

खड्ड्यांतील रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी करू नका शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी केवळ मुरूम टाकला जातो. मात्र, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, वाहनांची सततची वर्दळ आणि अवजड वाहनांमुळे काही दिवसांतच पुन्हा खड्डे तयार होतात. त्यामुळे नागरिकांना वारंवार त्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संगम चौक ते शिवस्मारक हा वर्दळीचा रस्ता असल्याने तात्पुरती मलमपट्टी न करता त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *