![]()
खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का? असा सवाल शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी एक सोशल मिडीया पोस्ट करत केला आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे, असे धंगेकरांनी म्हटले आहे. खरातच्या आश्रमासाठी सरकारकडून 5 कोटींचा निधी रवींद्र धंगेकर म्हणाले की, खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिना आयोगाचे पद सोडावे लागले. त्यांची अनेक तपास यंत्रणाच्या मार्फत चौकशी झाली. याचा अहवाल जनतेसमोर का आला नाही? हा गंभीर विषय आहे. खरातच्या आश्रमांसाठी सरकारी 5 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे खरात यांचे पाय धरताना दिसत आहेत. अनेक मंत्री म्हणतात चंद्रकांत पाटील यांचा मोठा त्याग आहे, तो खरातच्या पाया पडताना दिसतो आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे काही खरातला एकदा नाही भेटले नाही ते अनेकदा खरातला भेटले आहेत. भोंदूकडे चंद्रकांत पाटील कशाला गेले तर तंत्र-मंत्र करण्यासाठीच गेले असतील. शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने पाऊलं पडत असतील त्यांना जर सरकार पाठिशी घालत असेल. प्रामुख्याने मुख्यमंत्री जर त्यांना पाठिशी घालत असतील तर ते चुकीचे आहे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हे ही वृत्त वाचा पवारांचा पक्ष भाजपची बी टीम नाही, डिलिमिटेशनवर कोणताही सौदा नाही:संस्कृतीप्रमाणे असणाऱ्या खाद्यावर बंदी योग्य नाही; मीरा-भाईंदर वादावर संजय शिरसाटांची भूमिका कोणताच पक्ष कोणाची बी टीम नसतो, प्रत्येकाचे आपले वेगळे अस्तित्व आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. एखाद्या पक्षाला विरोध किंवा पाठिंबा दिला म्हणून त्यावर तातडीने बोलणं योग्य नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंजली आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या पक्षावर केलेल्या भाजपची बी टीम या टीकेवर ते बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या केवळ बातम्या आहेत; त्यांनी स्वतः सांगितले आहे की आम्ही डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देणार आहोत, याबदल्यात दुसरा असा काही सौदा झालेला नाही. शरद पवार राजकीय निवृत्ती घेतील असे वाटत नाही; त्यांची तब्येत बरी नसली तरी ते दुष्काळी भागाचे दौरे करत आहेत, असेही शिरसाट यांनी नमूद केले. वाचा सविस्तर
Source link
चाकणकरांना हटवले, मग चंद्रकांत पाटलांबाबत वेगळा न्याय का?:खरातच्या आश्रमासाठी 5 कोटींचा सरकारी निधी, माझ्याकडे पुरावे; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप