Headlines

काठीने मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यू:हडपसरमध्ये शिवा कोबळकरविरुद्ध गुन्हा; ज्येष्ठ महिलेची 85 हजारांची सोनसाखळी हिसकावली




काठीने मारहाण केल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. भटक्या श्वानाला मारहाण करुन त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शिवा सुभाष कोबळकर (वय ४०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शुभम बालाजी पोटेवाड (वय २४, रा. कृष्णानगर, महंदमवाडी, हडपसर) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णानगर भागात रस्त्यावर झोपलेल्या एका भटक्या श्वानाला आरोपीने काठीने मारहाण केली. मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंध ११ (१), (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक एस सुतार तपास करत आहेत. ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांची साेनसाखळी चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना सदाशिव पेठेतील लोकमान्यनगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला सदाशिव पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या दररोज सकाळी लोकमान्यनगर परिसरातील जाॅगिंग पार्क परिसरात फिरायला जातात. मंगळवारी (२३ नोव्हेंबर) त्या सकाळी पावणेसातच्या सुमारास फिरायला गेल्या होत्या. लोकमान्यनगर जाॅगिंग पार्कजवळ चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी लोकमान्यनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *