Headlines

जल साठवणुकीमधून डेंग्यूचा विळखा:बांबर्डामध्ये चिमुकले तापाने फणफणले, पुंडा आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीत 2 सक्रिय रुग्णांसह ताप-खोकल्याची साथ




अकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पुंडा अंतर्गत येणाऱ्या बांबर्डा बुद्रुक गावात सध्या डेंग्यूसदृश्य आजाराने डोके वर काढले असून, लहान मुलांना याचा मोठा फटका बसत आहे. मागील महिन्यात गावात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळले होते, तर सध्या दोन सक्रिय रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय गावात ताप व खोकल्याच्या रुग्णांची संख्याही वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवन प्राधिकरणाकडून गावाला आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना घरातील टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या उघड्या राहिल्याने त्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढल्याची माहिती ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने दिली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून आतापर्यंत दोन वेळा फवारणी आणि ‘कोरडा दिवस’ पाळण्याची दवंडी देण्यात आली आहे. मात्र, ही कार्यवाही अपुरी पडत असल्याने केवळ औपचारिकता न राहता अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र पुंडा यांनी संयुक्तपणे घराघरांत जाऊन सर्वेक्षण करावे, तातडीने औषधोपचार उपलब्ध करून द्यावे आणि नियमित धूरफवारणी करावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे. उघड्या पाण्यात डासांची अळी साठवलेल्या पाण्याच्या टाक्या, पिंप आणि भांडी नेहमी घट्ट झाकण लावून बंद ठेवावीत. उघड्या पाण्यात डासांची अळी सहज तयार होते. घरातील पाण्याची भांडी, टाक्या, कुलर आणि पक्ष्यांसाठी ठेवलेली भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करत स्वच्छ घासून कोरडी करावीत व नंतरच पुन्हा पाणी भरावे. ^ग्रामपंचायत बांबर्डा येथे जलद ताप सर्वेक्षण करत आरोग्यविषयक कार्यवाही करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत जलजन्य व कीटकजन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. कोणताही ताप आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. -डॉ. प्रवीण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, अकोट. अधिक जनजागृती करणार ^ जीवन प्राधिकरणाकडून आठ दिवसांआड पाणी येत असल्याने नागरिक पाणी साठवून ठेवतात, त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. ग्रामपंचायतीकडून आतापर्यंत दोनदा फवारणी करण्यात आली आहे. कोरडा दिवस पाळण्याची दवंडीही दिली आहे. यामुळे धोका कमी होईल. आगामी काळात गावात ‘जीवन ड्रॉप’ चे वाटप करत अधिक जनजागृती केली जाईल अतुल इंगळे, ग्रामसेवक, बांबर्डा बु. ताप आल्यास तपासणी करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *