Headlines

सुखना नदीत सोडले जाणारे औद्योगिक आणि ड्रेनेजचे सांडपाणी तत्काळ रोखा:नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामांची मनपा आयुक्तांकडून पाहणी




सुखना नदीचे रूप पालटण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामांची महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नदीपात्रातील सर्व अतिक्रमणे तत्काळ निष्कासित करा. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य उद्यान अधिकारी तथा सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे प्रमुख विजय पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सांडपाणी आणि प्रदूषणावर आयुक्तांचा संताप पाहणी दौऱ्यादरम्यान नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त आणि काळ्याकुट्ट पाण्याबाबत आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे प्रदूषित सांडपाणी औद्योगिक क्षेत्रातून नदीत सोडले जात असेल, तर “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा”शी तातडीने समन्वय साधून त्यावर तत्काळ प्रतिबंध घालावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच शहरातील ज्या भागातून नागरिकांचे ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे, त्याची गंभीर दखल घ्या. तातडीने कारवाई करा. नदीचे प्रदूषण थांबवण्याचे कडक आदेशही त्यांनी दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *