Headlines

Sanjay Shirsat Corruption Allegation; Narsing Udgirkar Claims Bribe Demand


सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन 25 कोटींच्या प्रस्तावावरून केलेले सर्व आरोप फेटाळून लावल्यानंतर, या प्रकरणातील तक्रारदार नरसिंग उदगीरकर यांनी पत्रकार परिषद घेत थेट मंत्री संजय शिरसाट, त्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD

.

6 ऑक्टोबर 2025चा प्रस्ताव ते 29 सप्टेंबर 2026 पर्यंत सतत डावलले

पत्रकार परिषदेत बोलताना नरसिंग उदगीरकर यांनी आपल्या 25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा संपूर्ण प्रवास आणि बैठकांमधील घडामोडींचा पाढा वाचला. मी 6 ऑक्टोबर 2025 रोजी समाज कल्याण आयुक्तांच्या शिफारशीसह 25 कोटी रुपयांचा परिपूर्ण प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे सादर केला होता.

3 बैठकांमध्ये परिपूर्ण प्रस्ताव डावलला

नोव्हेंबर 2025 मध्ये (25 नोव्हेंबर 2025 च्या सुमारास) झालेल्या बैठकीत 12 ते 13 प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यातील 6 ते 7 प्रस्ताव मंजूर झाले, मात्र माझा परिपूर्ण प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यानंतर झालेल्या पुढच्या बैठकीतही माझा प्रस्ताव डावलून इतरांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पुढे 29 सप्टेंबर 2026 रोजी पुन्हा बैठक झाली; त्यातील 12 ते 13 प्रस्तावांमध्ये त्रुटी असलेले 6 प्रस्ताव मंजूर केले गेले, पण माझा परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा एकदा प्रलंबित ठेवण्यात आला. यासाठी मी 8 ते 10 वेळा मंत्रालयात फेऱ्या मारल्या.

नथानी हाईट्सच्या 72व्या मजल्यावर रात्री बोलावले

लाच मागणीच्या प्रसंगाचा तपशील देताना उदगीरकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची नावेच जाहीर केली. नोव्हेंबर 2025 मध्ये ज्या दिवशी बैठक झाली, त्याच दिवशी रात्री 11.30 ते 11.45 वाजण्याच्या सुमारास मला मुंबई सेंट्रल येथील नथानी हाईट्स या इमारतीच्या 72 व्या मजल्यावर बोलावण्यात आले. वर जाताना खालील रजिस्टरमध्ये मी माझा मोबाईल क्रमांकही नोंदवला आहे.

मंत्र्यांसह ओएसडी व खासगी सचिवांची उपस्थिती

वर गेल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी माझा प्रस्ताव कसला आहे याची विचारणा केली. त्यावेळी तिथे मंत्र्यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे आणि खासगी सचिव भारत कदम हे दोघेही उपस्थित होते. मला समोर बसवून ‘किती ॲडजस्टमेंट करणार?’ असे विचारण्यात आले.

20 टक्के प्रमाणे 5 कोटींची मागणी

मी यावर विचारले असता, प्रस्तावाच्या 20 टक्के म्हणजेच 5 कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. माझ्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याचे मी सांगताच, ‘2 टप्प्यांत पैसे द्या, पण पैसे दिल्याशिवाय तुमचा प्रस्ताव मंजूर होणार नाही’, असे मला स्पष्टपणे सुनावण्यात आले. मी होकार किंवा नकार न देता तिथून निघून आलो.

एसीबीकडे तक्रार केली, पण तिथूनच मंत्रालयात टीप गेल्याने सापळा फसला

या प्रकारानंतर आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतल्याचा दावाही नरसिंग उदगीरकर यांनी केला आहे. निवासस्थानावरून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी वरळी येथील एसीबी कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेत तक्रार नोंदवली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार सापळा रचण्यासाठी मी काही दिवसांनी पुन्हा मंत्र्यांच्या कार्यालयात गेलो.

ओएसडी नितेश भंडारे यांचा थेट सवाल

कार्यालयात जाताच तिथे असलेल्या नितेश भंडारे नावाच्या दुसऱ्या ओएसडीने मला थेट विचारले की, “तुम्ही वरळीला एसीबीच्या कार्यालयात गेला होतात का?” सापळा फसू नये म्हणून मी तिथे गेलो नसल्याचे सांगितले; मात्र एसीबीच्या कार्यालयातूनच मंत्र्यांच्या कार्यालयाला टीप गेली असावी आणि त्यामुळे माझा हा संपूर्ण सापळा (प्रोग्राम) अयशस्वी झाला.

तक्रारीनंतर मंत्र्यांची धमकीवजा भूमिका

पुढे जेव्हा मी पुन्हा मंत्रालयात गेलो, तेव्हा ओएसडीने मला साहेबांना भेटण्यास सांगितले. मंत्र्यांना भेटलो असता त्यांनी मला सुनावले की, “तुम्ही आमची एसीबीकडे तक्रार केली आहे, आता तर पैसे घेतल्याशिवाय तुमचा प्रस्ताव अजिबात मंजूर करणार नाही.” दरम्यान, आपल्याकडे या प्रकरणाचे पुरावे असून तक्रारीची प्रतही माध्यमांना देणार असल्याचे उदगीरकर यांनी स्पष्ट केले आहे. या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

———————————————————–

हेही वाचा…

मंत्री म्हणून मला फक्त 10 कोटींपर्यंतचेच अधिकार: मातोश्रीच्या मागच्या दरवाजातून टेम्पो भरून कसे पैसे यायचे, हे संजय राऊतांनी सांगायला लावू नये -संजय शिरसाट

लातूर येथील एका प्रस्तावापोटी 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा अवमान केल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी (25 नोव्हेंबर) आक्रमक भाषेत समाचार घेतला आहे. “मंत्री म्हणून मला केवळ 10 कोटी रुपयांपर्यंतच्याच प्रस्तावांना मंजुरी देण्याचे प्रशासकीय अधिकार आहेत; 10 कोटींच्या पुढील कोणतीही फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे जाते आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची सही लागते. प्रशासनाचे किमान ज्ञान नसलेले संजय राऊत 25 कोटींच्या प्रस्तावावरून निराधार आरोप करत आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात 100 दिवस तुरुंगात राहून आलेल्या व्यक्तीने आम्हाला भ्रष्टाचार आणि अण्णाभाऊ साठे शिकवू नयेत; ‘मातोश्री’च्या मागच्या दरवाजातून कसे टेम्पो भरून पैसे आत यायचे, हे सांगायला लावू नका,” अशा जळजळीत शब्दांत शिरसाट यांनी पलटवार केला. यावेळी त्यांनी तक्रारदार नरसिंग उदगीरकर यांचे जुने ऑडिओ रेकॉर्डिंगही माध्यमांसमोर ऐकवत या संपूर्ण प्रकरणामागील राजकीय षडयंत्र उघड केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.