![]()
व्यसनमुक्ती केंद्रात ठेवल्याने पतीने महिलेवर स्वयंपाक घरातील चाकूने वार केल्याची घटना वाघोली भागात घडली. या प्रकरणी पती राजेश पोपट वडघुले (वय 38, रा. वास्तू गोल्ड सोसायटी, बायएफ रस्ता, वाघोली ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पत्नी सोना
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला दारूचे व्यसन आहे. दारुचे व्यसन सोडविण्यासाठी पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने पतीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविले होते. 25 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्रा का पाठविले? अशी विचारणा करुन आरोपीने महिलेच्या बोटावर स्वयंपाकघरातील चाकूने वार केले. या घटनेत महिलेच्या बोटांना दुखापत झाली. पोलिसहवालदार एस ठोंबरे तपास करत आहेत.
तरुणीवर सामुहिक अत्याचार प्रकरणात दोघे अटकेत
मैत्रिणीवर सामुहिक अत्याचार प्रकरणी येरवडा पोलिसांनी मित्रासह दोघांना अटक केली. कोंढवा परिसरात नुकतीच ही घटना घडली. या प्रकरणी गणेश पाठक (वय 22), श्रीनिक चव्हाण (वय 32, दोघे रा. पर्वती) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे मित्र आहेत. तिघे एकाच ठिकाणी काम करतात.
तरुणीला आमिष दाखवून आरोपींनी कोंढव्यातील एका लॉजवर नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केले. या घटनेची कोणाला माहिती देऊ नको, अशी धमकी आरोपींनी पीडित तरुणीला दिली. घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पाठक आणि चव्हाण यांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गिते तपास करत आहेत.