Headlines

नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार!: अर्धा तास रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी तरुणाचा तडफडून मृत्यू; पाम बीच रोडवरील घटना



नवी मुंबईतील पाम बीच रोडवर एका भरधाव अज्ञात वाहनाने स्कूटीस्वार तरुणाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, या दुर्घटनेत संबंधित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नस

.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वाहनाच्या धडकेनंतर जखमी तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे पाहताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत 108 क्रमांकावर रुग्णवाहिका आणि 112 क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. मात्र, तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यानेच या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचे सांगितले जात असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रुग्णवाहिकांच्या युनियनबाजीवर नागरिकांचा संताप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी नवी मुंबईतील आरोग्य सुविधेच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णवाहिका चालकांनी आपापल्या युनियन बनवल्या असून, रात्रीची वेळ आहे किंवा चालक उपलब्ध नाही अशी कारणे देत ते तातडीच्या काळात सेवा देण्याचे टाळतात, असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, इतर रुग्णवाहिकांनाही ते या परिसरात येऊ देत नाहीत, अशी तक्रारही स्थानिकांनी केली आहे.

मृत्यूनंतर रुग्णवाहिका येण्याचा उपयोग काय? प्रवाशांचा सवाल

“हा तरुण अर्धा तासापासून इथेच तडफडत पडून होता, त्याला वेळेवर मदत मिळाली असती तर आज तो जिवंत असता,” अशी संतप्त भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिका बोलावण्याचे प्रयत्न केले, मात्र तरुणाचा मृत्यू झाल्यानंतरच रुग्णवाहिका दाखल झाली. या भयंकर वस्तुस्थितीचा निषेध करत, मनमानी करणाऱ्या रुग्णवाहिका युनियन आणि संबंधित चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *