Headlines

युवकांनो, नोकरी मागणारे नव्हे, देणारे बना:अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे आवाहन‎




प्रतिनिधी | अहिल्यानगर “ग्रामीण आणि मागासवर्गीय भागातील युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता यशस्वी उद्योजक होऊन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे, तेच ज्ञान आणि कौशल्य तुमचे भविष्यातील ‘ब्रेड अँड बटर’ ठरेल,” असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले. अहिल्यानगर मध्ये दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री संस्था (डिक्की ) व नॅशनल एससी –एसटी हब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मागासवर्गीय युवांसाठी आयोजित उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे विभागीय सहाय्यक व्यवस्थापक राहुल मिश्रा, राष्ट्रीय लघु उद्योग निगमचे रितेश रंगारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवदास, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आशिष नवले, सीए असोसिएशनचे विशाल गांधी, पुण्याच्या इंजिनीअरिंग इंडिया कंपनीचे नरेश रामटेके, इंडियन ओईल कॉर्पोरेशनचे अक्षय ओसवाल, कार्यक्रमाचे संयोजक व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेचे समन्वयक चंद्रकात काळोखे आदींसह केंद्र सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी, तज्ज्ञ वक्ते उपस्थित होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व भागातील सुमारे १५० युवक युवती उपस्थित होते. कलुबर्मे म्हणाले, कोणतीही संधी छोटी नसते. छोट्या संधीतूनच मोठ्या उद्योगाचे मार्ग मोकळे होतात. या मेळाव्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राहुल मिश्रा, रितेश रंगारी , जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवदास, अग्रणी बँकेचे आशिष नवले, ‘डिक्की’चे समन्वयक चंद्रकांत काळोखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन प्रदीप बागुल यांनी केले, तर आभार सचिन भारस्कर यांनी मानले. मागासवर्गीय युवकांना केंद्राच्या योजनांचा लाभ मिळावा ‘डिक्की’चे समन्वयक चंद्रकांत काळोखे यांनी नॅशनल एससी-एसटी हबच्या कामाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मागासवर्गीय युवकांना मिळावा, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील असा हा पहिलाच मेळावा नगरमध्ये होत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *