Headlines

संभाजीनगरचा प्रोझोन माॅल रहेजा समूह खरेदी करणार:1300 कोटींचा व्यवहार, कोइम्बतूरच्या मॉलचाही समावेश




‘के रहेजा कॉर्प’ समूहाचा भाग असलेल्या ‘इनॉर्बिट मॉल्स’ने शहरातील ‘प्रोझोन मॉल’ खरेदी करण्याची तयारी केली आहे. रहेजा समूह संभाजीनगरसह कोइम्बतूर येथील मॉल खरेदी करणार असून हा व्यवहार १,३०० कोटी रुपयांचा आहे. ‘प्रोझोन रिअल्टी’ने शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्यवहारामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तसेच ऑपरेशन्स व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होतील. ६ लाख चौरस फुटांची जागा प्रोझोन मॉल हा भारतातील सर्वात मोठ्या मॉल्सपैकी एक आहे. तसेच तो देशातील पहिल्या आडव्या रचनेच्या सर्वात मोठ्या मॉल्सपैकी एक मानला जातो. या मॉलमध्ये ६ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त रिटेल स्पेस उपलब्ध आहे. हा संभाजीनगर शहरातील पहिला आधुनिक मॉल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *