Headlines

यशवंत टॅलेंट सर्च परीक्षेत‎विद्यार्थ्यांचे घवघवीत यश‎:५५ शाळांमधील ३२०० विद्यार्थ्यांचा सहभाग‎




प्रतिनिधी | सोनई नेवासा तालुक्यातील दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित यशवंत टॅलेंट सर्च या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील एकूण ३२०० विद्यार्थी ५५ शाळांमधून सहभागी झाले होते. या निकालात तालुका स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये यश अकॅडमीचा अमेय लेंबे ९६ टक्के गुणांसह प्रथम, श्रीनिका बानकर, आरुष कुलकर्णी, सागर धापटे दोघे यांनी ९४ टक्क्यांसह द्वितीय, तसेच ९० टक्के गुण मिळवून विविध शाळांतील ९ विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. यामध्ये जानवी खंडागळे, तेजश्री गाडे, अर्पिता शेटे, संस्कृती बानकर, सार्थक देवतरसे, अर्चित चंगेडिया, गौरव भवर, समर्थ बारहाते, आदिती देहाद्रे यांचा समावेश आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील स्पर्धा परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तयारी करण्यास मदत होणार असल्याचे मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा, शनैश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनई, पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ सोनई तसेच विनर करिअर अकॅडमी या ठिकाणी शैक्षणिक सवलत देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक शाळांनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांची यादी व त्या शाळेत आलेले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह यादी प्रत्येक शाळेस १ मे रोजी पोहोच करण्यात येईल असे समन्वयक डॉ. विनायक देशमुख यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *