Headlines

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "प्रोग्रेसिव्ह किट'चे केले वितरण:विद्यार्थ्यांमध्ये दशमूल्ये रुजविण्याचा उपक्रमातून केला प्रयत्न‎




प्रतिनिधी | अहिल्यानगर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अभियान, उपक्रमशील शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या विविध वार्षिक उपक्रमाअंतर्गत व्यक्तिमत्व विकास अभिलेखे जपणारी प्रोग्रेसिव्ह किट- “पीके’ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित केली आहे. याप्रसंगी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सुरेश क्षीरसागर, डॉ. कल्पना घडेकर, प्राचार्या वसुधा जोशी, ज्ञानेश झांबरे, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. या किटमध्ये कागदी तिरंगी ध्वजासह, वर्षभरातील स्पर्धांची प्रमाणपत्रे, दस्तऐवज, दिनदर्शिका, सूर्यनमस्कार तक्ता, झाडांच्या बिया, सशस्त्र सेनाध्वज, वेळापत्रक, मूल्यवर्धन पुस्तिका, वह्या पुस्तकांसाठी स्टिकर्स, गणित- भूमिती व बुद्धिमत्ता विषयातील सूत्रे पुस्तिका, मास्क, नासाच्या चांद्रमोहिमेचा बोर्डिंग पास, मनपा निवडणूक प्रमाणपत्रे, भारत सरकारच्या डिजिटल इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक प्रौद्योगिकी मंत्रालय व संस्कृती मंत्रालयाचे “हमारा संविधान हमारा स्वाभिमान, वंदे मातरम राष्ट्रीय गीताची १५० वर्ष, एआय परिषद या अभियानांची प्रमाणपत्रे आदी सुमारे ३० शैक्षणिक घटकांचा समावेश आहे. “वर्गशिक्षक म्हणून संपूर्ण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सुमारे १०२ विद्यार्थ्यांना पीकेमधून मूल्यशिक्षणाची वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, सर्वधर्मसहिष्णुता, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री-पुरुष समानता ही दशमूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बागुल यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *