Headlines

ढोरेगावचे केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात




गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कारभारी दाणेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचा संगम या विचारांनी प्रेरित असलेल्या दाणेकर यांच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, ही शाळा म्हणजे माझ्या स्वप्नातील आदर्श शाळा वाटली. शालेय परिसर, स्वच्छता, वृक्षसंवर्धन, कार्यालयीन व्यवस्था, आदर्श शाळा म्हणून झालेली निवड तसेच विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीपलीकडे खेळाडू म्हणून गाठलेले यश हे सर्व कौतुकास्पद आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सुमित मुंदडा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, सरपंच अयुब पटेल, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, अनिलकुमार सकदेव, मधुकर वालतुरे तसेच एसएससी बोर्डाचे माजी सचिव रमेश गिरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी दाणेकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. ढोरेगावचे केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर यांचा सत्कार करताना आमदार प्रशांत बंब.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *