Headlines

सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांनी घेतली दर्ग्यांची माहिती:खुलताबादमध्ये उत्साहात स्वागत, दर्गा कमिटीच्या वतीने केला सत्कार‎



ऐतिहासिक व सुफी संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुलताबाद शहरात दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत ॲड. महबूब निजामी यांचीही उपस्थिती होती. या निमित्ताने शहरातील विविध

.

खुलताबादमध्ये आगमन होताच सय्यद फरीद अहमद निजामी यांनी सर्वप्रथम हजरत बुरहानुद्दीन गरीब (रह.) यांच्या पवित्र दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले व प्रार्थना अर्पण केली. यावेळी दर्गा समितीचे अध्यक्ष एजाज अहमद, सचिव मोहम्मद मतीन आणि माजी नगराध्यक्ष व दर्गा कमिटी सदस्य ॲड. कैसरोद्दीन सदस्य सालेह मोहम्मद यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना दर्ग्याच्या परंपरा व इतिहासाची माहिती दिली.

यानंतर त्यांनी हजरत सय्यद जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी (बावीस ख्वाजा) यांच्या दर्ग्याला भेट दिली. या ठिकाणी अध्यक्ष शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, सचिव मसीयोद्दीन व हाजी इक्बाल अहमद यांनी पारंपरिक पद्धतीने ‘दस्तारबंदी’ करून त्यांचा गौरव केला. या प्रसंगी हमीदुद्दीन मौलवी, अबू मोहम्मद व अयाजोद्दीन यांनी सुफीवाद (तसव्वुफ) तसेच संतांच्या जीवनकार्यावर सखोल चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान माजी नगराध्यक्ष व दर्गा कमिटी सदस्य ॲड. कैसरोद्दीन यांनी दर्ग्यांशी संबंधित विविध कायदेशीर बाबींवर सय्यद फरीद अहमद निजामी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पाहुण्यांनी हजरत ख्वाजा अमीर-ए-आला संजरी यांच्या दर्ग्यालाही भेट देत दर्शन घेतले. यावेळी आबिद जहांगीरदार, अलीमुद्दीन मुजावर, सादिक मुजावर व इरफानोद्दीन यांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *