![]()
शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील आव्हानात्मक परिस्थितीनंतरही उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला. संभाजीनगरातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार फुटलेले असताना, मराठवाड्यात पक्षाची विस्कटलेली घडी पुन्ह
.
सातत्याने आंदोलनांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न लावून धरल्याने दानवे यांची दावेदारी प्रबळ ठरली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विखुरलेल्या संघटनेला पुन्हा एकत्र बांधण्यासाठी दानवे यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला.
मनपात सत्ता गमावली
दानवे यांना पद मिळाले तरी संभाजीनगरात पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. २५ वर्षांपासून असलेली सत्ता शिवसेनेने गमावली. केवळ सहा नगरसेवक निवडून आले. जिल्हा परिषदेत ही संख्या ९ इतकी होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात मात्र पक्षाला फारसे यश मिळाले नाही. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही उमेदवार जिंकू शकला नाही.
पक्षाची ताकद वाढावी यासाठी उमेदवारी
छत्रपती संभाजीनगरात पक्षाचे आमदार, खासदार नाहीत. त्यामुळे इथे पक्षाची ताकद वाढावी यासाठी पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठी मदत होईल. इथे शिवसेना वाढली की त्याचा संदेश मराठवाड्यात जातो. हा सर्व विचार करून दानवेंना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. – चंद्रकांत खैरे, नेते, उद्धवसेना