Headlines

सुख आणि दुःखाच्या प्रवाहामध्ये जो समाधान मानतो तोच जीवनात सुखी:ठाणगावमध्ये कथाकार संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎



सुख आणि दुःखाच्या प्रवाहात जो व्यक्ती समाधान मानतो, तोच जीवनात खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, असे निरुपण कथाकार संतोष जाधव यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी चरित्र कथेच्या कार्यक्रमात ते बोलत हो

.

पुढे बोलताना कथाकार जाधव यांनी प्रत्येकाला आयुष्यात चांगल्या-वाईट काळाचा सामना करावाच लागतो. मात्र, चांगले दिवस येण्यासाठी धीर धरण्याची आवश्यकता आहे. वाईट दिवस हे कर्माचे खेळ आहेत, याची जाणीव माणसाला होणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसाने ईश्वराला विसरू नये. जो परमेश्वराला अनन्यभावे शरण जातो, तोच या जगात सुखी होतो. मात्र, हे नामस्मरण अंतःकरणातून येणे आवश्यक आहे. निसर्गाने सुखासोबत दुःखही दिले आहे, त्यामुळे मानवाने या दोन्ही स्थितीत आनंद शोधायला हवा. कलियुगातील वाढत्या चंगळवादामुळे आजची पिढी भारतीय धर्म-संस्कृती विसरत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. आपली संस्कृती टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, त्याची जाणीव वेळीच होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कथेसाठी ठाणगावसह आडवाडी, म्हाळुंगी, केळी, टाहाकारी, पाडळी, आशापूर, हिवरे, पिंपळे, डुबेरे या परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कथेच्या निरूपणानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन संयोजक जयराम शिंदे यांनी केले.

कथामंचावर श्री स्वामी समर्थ महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. दर्शन घेण्यासाठी अबालवृद्धांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. कथेनिमित्त ठाणगावला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविक आणि स्वामी सेवेकऱ्यांच्या उपस्थितीमुळे गावांतील घरे पाहुण्यांनी फुलून गेली आहेत. तसेच, या मंगलमयी वातावरणामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि आनंदाचा अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत आहे. स्वामींच्या या अलौकिक सोहळ्याने ठाणगावसह संपूर्ण परिसराचे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे भरते आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *