Headlines

पैठणला 21 हजार वह्यांतून साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे रेखाचित्र




सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांमुळे कायम चर्चेत राहणारे पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून आता पैठण तालुक्यात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रम साकार होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १४ मे रोजी तब्बल २१ हजार शालेय वह्यांच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य रेखाचित्र साकारण्यात येणार असून, या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र उत्सुकता लागली आहे. आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने शेखर शिंदे, जालिंदर आडसुळ यांच्या माध्यमातून आयोजित हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, शिक्षणाची प्रेरणा आणि इतिहासप्रेम यांचा अनोखा संगम ठरणार आहे. विशेष म्हणजे, या अभिनव संकल्पनेची नोंद थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविली जाणार आहे. हे भव्य आणि आकर्षक रेखाचित्र प्रसिद्ध चित्रकार उद्देश गोवर्धन पघळ यांच्या हस्ते साकारले जाणार असून, श्री एकनाथ महाराज समाधी मंदिर अन्नछत्र परिसरात हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. हजारो वह्यांमधून उभे राहणारे संभाजी महाराजांचे हे विराट चित्र पाहण्यासाठी नागरिकांसह इतिहासप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरणही होणार असून, “इतिहासाची प्रेरणा आणि शिक्षणाची साथ” हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वह्यांचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार Ã२१ हजार वह्यातुन संभाजी महाराज यांचे चित्र विद्यार्थ्यांनासमोर असणार आहे. यामुळे संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना कळणार आहे. शाळा सुरू होताच पहिल्या दिवशी वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. पैठणमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम आहे. – शेखर शिंदे, विलासबापु प्रतिष्ठानचे सदस्य, पैठण.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *