Headlines

लासूर स्टेशन परिसरात पूर्वमशागतीला वेग:शेतकऱ्यांकडून बांधबंदिस्ती सुरू, ट्रॅक्टरने नांगरणी सुरू, बैलजोडीने नांगरणीचे चित्र दुर्मिळ‎




गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, शिल्लेगाव, माळीवाडगावसह ग्रामीण भागातील शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीला लागले असून शेतशिवारात मशागत करण्याची घाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रब्बी हंगामातील पिके घेऊन आता शेतकरी खरीप पेरणीकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. परिसरात बैलजोडीकडून नांगरणीचे चित्र दुर्मिळ झाल्याचे दिसून आले. शेतीमधील गवत, कडबा यासह इतर पिके काढून कोळपणीला सुरुवात केली आहे. एकीकडे लग्नसराई आणि दुसरीकडे शेतकामांची घाई असे चित्र शेतशिवारात दिसत आहे. मेच्या अखेरपासून खरिपाच्या धूळपेरणीला सुरुवात होते. परंतु तालुक्यातील शेतकरी पेरणीयुक्त पाऊस पडल्यावरच पेरणीस सुरुवात करतात. ग्रामीण भागातील शेतकरी कापूस, मका, तूर, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात पिके घेत असतात. या पिकांसाठी शेतीमध्ये शेणखत वापरून जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत केली जाते. पावसाळ्यात शिवारात पाणी साचण्यासाठी बांध असण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे बांधावर माती टाकून त्याची मजबूत बांधणी शेतकरी दरवर्षी करत असतात. या वर्षीही शेतकरी बांधावर माती टाकून मजबूत करण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत. सध्या अनेक भागातील शेतकरी मिरची लागवडीच्या तयारीत दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी मल्चिंग अंथरून ठिबकवर मिरची लागवड पद्धतीवर भर देत आहेत. सध्या काही भागातील शेतकऱ्यांनी धूळपेरणीसाठी मशागत सुरू केली आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *