Headlines

पहिल्या चार काठ्या तुम्ही झेला, पुढच्या आम्ही झेलू:बाधितांच्या लढ्याला बळ, शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी एक व्हा, रोहित पवारांचा सरकारवर घणाघात‎



कोणतीही गरज नसताना आणि कुणाचीही मागणी नसताना होऊ घातलेला ‘नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग’ केवळ कमिशनसाठी रेटला जात आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या खर्चाशी तुलना केली, तर या महामार्गातून सरकारला किमान ४० हजार कोटी रुपये मिळणार आहेत. हा शासनाचा अहंका

.

२०२३ मध्ये ८०६ किमी लांबीच्या या रस्त्याचा खर्च ५७ हजार कोटी होता, तो आता १ लाख १ हजार कोटींवर गेला आहे. म्हणजेच प्रति किलोमीटर १२० कोटी रुपये खर्च दाखवला जात आहे. याउलट, नितीन गडकरींनी उत्तर प्रदेशात केलेल्या ८ पदरी रस्त्याचा खर्च केवळ ७० कोटी प्रति किमी आहे. हा प्रचंड फरक भ्रष्टाचाराकडे अंगुलीनिर्देश करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. शेतकऱ्यांना धीर देताना पवार म्हणाले की, “या रस्त्याच्या मोजणीला ठाम विरोध करा. मोजणीच्या वेळी पहिल्या चार काठ्या तुम्ही खाल्ल्या तर पुढच्या सर्व काठ्या झेलण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.” शासन लोकप्रतिनिधी आणि बाधितांना गृहीत धरून काम करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मेळाव्याला आमदार उत्तमराव जानकर, दत्ता मगर, के. के. पाटील, मच्छिंद्र ठवरे, गिरीश फोंडे, अजित बोरकर आणि ॲड. लक्ष्मण मगर यांच्यासह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते. निमगावच्या या मेळाव्याने शक्तीपीठ महामार्गाविरोधात माळशिरस तालुक्यातून मोठे जनआंदोलन उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. बार्शी, माढा, पंढरपूर आणि माळशिरस या ४ तालुक्यांतील ४३ गावांमधून जाणार आहे. बार्शी तालुक्यातील मेहशिंगी, रुईधवर, वन्हाडी, बेगडा, सुरडी, गोंडगाव, नरेगाव, रुई, मालेगाव, मुंगशी, रांजण, सर्जापूर, वैराग, मुक्ताई वॉटर पार्क, धोराळे, सावळी, धानोरे. माढा तालुक्यातील मानेगाव, चव्हाणवाडी, वाकाव, केवळ, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, रोपळे, वडाचीवाडी, सोलंकरवाडी, बावी, मोडनिंब, अरण, तुळशी. पंढरपूर तालुक्यातील करकंब-व्यवहारे वस्ती, नेमतवाडी, बादलकोट, पेठे, आवे, नांदोरे. (भीमा नदीवर पूल होणार) माळशिरस तालुक्यातील नेवरे, जांभूळ, विठ्ठलवाडी, माळखांबी, उघडेवाडी, वेळापूर, मजरेवाडी, निमगाव, गारवाड, चांदापुरी. (घुमेरा ओढ्यावर पूल होणार) जाणार आहे. . कंत्राटदारांची चांदी: राज्यातील कंत्राटदारांचे १ लाख कोटी येणे असताना, ही कामे गुजरात आणि आंध्रच्या ठेकेदारांना का दिली जात आहेत. . पाईप घोटाळा: जलजीवन मिशनच्या पाईप्सपैकी ९० टक्के पाईप्स गुजरातून का आणले जात आहेत. . तिजोरी रिकामी: सरकारकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींची नावे कट केली जात आहेत, मग या महामार्गाला पैसे कोठून येतात. पंतप्रधानांनी तेल, सोने खरेदी आणि खर्चाबाबत केलेल्या आवाहनावर भाजप नेत्यांच्या उधळपट्टीवर निशाणा साधला. “लोकांना हे खाऊ नका, ते करू नका म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या कार्यक्रमातील विमाने उडवणे आधी थांबवले पाहिजे. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार अगोदर आवरला पाहिजे. शासनाने ५ मे रोजी अधिसूचना काढली, पण भोंदू बाबा अशोक खरात याला शासनातील कोणीतरी आधीच टीप दिल्याने त्याने या प्रस्तावित मार्गावर ११ एकर जमीन आधीच खरेदी करून ठेवली आहे. स्वतःचे भविष्य माहित नसणाऱ्याला शासनाच्या ‘कृपेने’ महामार्गाचे भविष्य आधीच कळले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. अजितदादा हे माझे काका असून त्यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मी लढा देणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून न घेतल्याने मला परराज्यात जावे लागले. यावेळी प्रोटोकॉल बाजूला ठेवला गेला,” असेही रोहित पवार यांनी सांगितले.

भोंदू बाबाला भविष्य आधीच कळाले

या ४३ गावांमधून जाणार शक्तीपीठ

पंतप्रधानांच्या आवाहनावर टोकदार टीका

विमान अपघातावरून सरकारला घेरले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *