Headlines

He went to bring his mother and left the world on the way. Two of Dhotri’s best friends died in a truck-car collision on the highway at Mohol.


.

पुण्यात भावाकडे गेलेल्या आईला आणण्यासाठी तो मोठ्या आनंदाने मित्रासोबत कारने गेला होता. पण आई म्हणाली, “मी आज तुमच्या सोबत येत नाही, नंतर येते.” आईला तिथेच सोडून तो मित्रासह घराकडे निघाला, मात्र सोलापूरची वेस गाठण्यापूर्वीच वाटेत काळाने घाला घातला. मोहोळजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ज्या मुलासोबत आई गावी आली नाही, मुलाच्या अंत्यविधीला त्या माऊलीला यावे लागले.

तेलंगवाडी शिवारात मध्यरात्री भीषण अपघात नागेश मल्लप्पा बिराजदार (वय २८) व संकल्प शिवपुत्र गुरव (वय २२, दोघे रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील तेलंगवाडी शिवारात हा अपघात झाला. नागेश व संकल्प हे दोघेकारने (एमएच १३ डीटी ८०९३) पुण्याहून सोलापूरकडे येत असताना, त्यांच्या कारणे समोरून जाणाऱ्या ट्रकला (टीएन ५४ आर ८८८१) पाठीमागून जोरदार धडक िदली. चक्काचूर झालेल्या कारमधून क्रेनने काढले मृतदेह धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मोहोळ पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कारचा ढिगारा बाजूला सारून अडकलेले मृतदेह बाहेर काढले. चालकाचा ताबा सुटल्याने किंवा डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संकल्प गुरव नागेश बिराजदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *