![]()
बार्शी तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनक्षोभ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तडवळे, यावली आणि ढोराळे या तीन गावांतील शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी एकवटले असून, “कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही,” या ठाम भूमिकेसह तीव्र आंदोलनाचे र
.
प्रस्तावित महामार्ग सुमारे १५ ते २० फूट उंचीवरून जाणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विस्कळीत दळणवळण, उंच रस्त्यामुळे शेतात जाण्या-येण्याचे छोटे मार्ग आणि वळण रस्ते बंद होतील. वाहतुकीचा प्रश्न, शेतमाल ने-आण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने दैनंदिन शेतीकामे पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. पिढ्यानपिढ्या कसत आलेल्या सुपीक जमिनी महामार्गासाठी संपादित केल्या जाणार असल्याने शेतकरी संतप्त आहेत. योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पर्यायी रस्त्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस हमी मिळालेली नाही. प्रशासनाने संवाद साधून मार्ग न काढल्यास हे आंदोलन राज्यभर गाजण्याची शक्यता आहे.
तडवळे, यावली आणि ढोराळे येथे नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. प्रशासनाने जबरदस्तीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठे ठिय्या आंदोलन आणि रस्ता रोको छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मते, हा महामार्ग स्थानिकांच्या सोयीचा विचार न करता लादला जात आहे. बार्शी तालुक्यातील हा विरोध केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून तो उदरनिर्वाहाशी जोडला गेला आहे. पर्यायी रस्त्यांचे नियोजन आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केल्याशिवाय प्रकल्पाचे काम पुढे नेणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
^आमच्या जमिनी, आमचा उदरनिर्वाह आणि आमचे हक्क धोक्यात घालून कोणताही विकास आम्हाला मान्य नाही. प्रशासनाने आमच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत, तर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू. रामेश्वर लोखंडे, शेतकरी, तडवळे.
^उलट शेती करणेच कठीण होईल शक्तीपीठ महामार्ग आमच्या जमिनीवरून जात असला तरी त्याचा आम्हाला कोणताही प्रत्यक्ष फायदा होणार नाही, उलट शेती करणेच कठीण होईल. समाधान देशमुख, शेतकरी, ढोराळे.