Headlines

Ashish Shelar Questions Manoj Jarange on Pawar-Thackeray Silence


आंदोलन होतात तो लोकशाहीचा आत्मा आहे. मराठा समाजाचे प्रश्न गंभीर, महत्त्वाचे योग्य आहेत. आंदोलनाला सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारची आहे. पण भाषा ही चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा ही भाषा वापरुच शकत नाही, अशी भावन

.

आशिष शेलार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करणं योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समाजाबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी तर केलेच आहे. त्यांचा एकेरी उल्लेख होऊ नये.जरांगे उद्धव ठाकरे, शरद पवारांनी काही केले नाही त्यावर काहीच बोलत नाही.

पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केले असून त्यांच्यावर टीका करत आहेत. मग इथे लोकांना संशय येतो. सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे लोकं मुख्यमंत्री होते त्यांच्यावर जरांगे काही बोलत नाही. या लोकांनी मराठा आरक्षणसाठी काही केले सुद्धा नाही. ज्या सरकारने मराठा समाजासाठी काम केले त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर मात्र जरांगे टीका करतात हे काय आहे, यामध्ये राजकारण आहे असे वाटते.

शशिकांत शिंदेंच्या पक्षाने मराठा समाजासाठी काय केले?

आशिष शेलार म्हणाले की, शशिकांत शिंदे यांचा पक्ष सत्तेत असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला काय दिले हे सांगावे आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावा. मनोज जरांगे यांनी अर्ज करणे आणि पोलिसांनी त्यांना परवानगी द्यायची का नाही हा पोलिसांचा प्रश्न आहे. मराठा समाजासाठी अनेक निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्याचे काम केले नाही ते काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

हे ही वृत्त वाचा

हा माणूस तुम्हाला फसवत आहे, जाळ्यात फसू नका-हिंदुस्तानी भाऊ

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल एकेरी भाषेत टीका करत आहेत. तुम्ही त्यांना हलक्यात घेत आहात का? ते असेच इतक्या मोठ्या पदावर गेले नाही.

तुमच्या सारखे किती गायब झाले असतील सांगता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देताय, तुमच्या मागे असणाऱ्या लोकांनी सांगितले तेच तुम्ही बोलत आहात. 10 वेळा उपोषण झाले, सोबतचे सर्व जण सोडून गेले सर्वांना समजले जरांगे बाथरुममध्ये जाऊन खातात सर्व लोकं त्यांना सोडून चालली आहेत, असे विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्तानी भाऊ’यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

मुंबई केंद्रशासित होणार नाही, पण अशी चर्चा कशाला?:शशिकांत शिंदेंचा भाजपला सवाल, जरांगेंच्या आंदोलनावरही भाष्य

मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने निर्माण झालेल्या चर्चेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे, असे सांगतानाच मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत महाराष्ट्राच्या जनतेने चिंता करण्याची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अशा प्रकारचा विषय चर्चेत आणण्याची गरजच काय, असा सवालही शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.