Headlines

Admin

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट!:20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

नागरी समितीला 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान:कोहिनूर राम नदी महोत्सवाचा समारोप, पुनरुज्जीवनाचा निर्धार

पुणे येथे कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. १८) भूगाव येथील नागरी समस्या निवारण समितीला उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते ‘राम नदी सेवक सन्मान’ प्रदान करण्यात आला. यावेळी राम नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. अनिल निवृत्ती करंजावणे,…

Read More

'मटण नीट शिजले नाही' म्हणून पतीला आला राग:मित्रासमोरच वाट्टेल ते सुनावले; अपमान सहन न झाल्याने पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका गृहिणीने किरकोळ कारणावरून आलेल्या रागातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘मटण नीट शिजले नाही’ या शुल्लक कारणावरून पतीशी झालेल्या वादाने चेतना मनोज जाधव या महिलेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. एका हसत्याखेळत्या संसाराची या घटनेमुळे राखरांगोळी झाली असून, संतापाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त…

Read More

ठप्प झालेले वाहन पासिंगचे काम पुन्हा सुरू:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांनी 15 लाख वाहनधारकांचा प्रश्न मार्गी

राज्यातील रिक्षा, टॅक्सी, स्कूलबस आणि टेम्पो चालकांसमोर ‘एटीएस’ (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीमुळे निर्माण झालेला वाहन फिटनेस तपासणीचा गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहन नूतनीकरण प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ठप्प झालेले वाहन पासिंगचे काम पुन्हा सुरू झाले असून, १५ लाख वाहनधारकांना दिलासा…

Read More

मुंबई-बंगळुरू मार्गावर मालवाहू टेम्पोला आग:परदेशी फर्निचर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात एका मालवाहू टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीत टेम्पोसह त्यातील परदेशी बनावटीचे महागडे फर्निचर जळून खाक झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी बाह्यवळण मार्गावरून जात असताना, वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतला. टेम्पोमध्ये परदेशी बनावटीचे फर्निचर होते. आग लागल्याचे लक्षात येताच, चालकाने…

Read More

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा:महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमांतर्गत पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी महापौर रवी लांडगे यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा समस्या सोडवण्यासाठी हा…

Read More

कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकात खोडा घालण्याचे कारण नव्हते:कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, अशोक चव्हाणांचा पलटवार

महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु, कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात…

Read More

हायकूचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते:कवी विजय पाडळकर यांचे 'हायकू – जागर' कार्यक्रमात मत

हायकू काव्यप्रकार परकीय नसून त्याचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते आहे, असे मत हायकू काव्यप्रकाराचे अभ्यासक आणि कवी विजय पाडळकर यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे जागतिक हायकू कविता दिनानिमित्त आयोजित ‘हायकू – जागर’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दिपाली दातार यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पाडळकर…

Read More

संभाजीनगरचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवणार:मनपा आयुक्त अमोल येडगे यांची ग्वाही; येडगे अन् जी. श्रीकांत यांचा स्वागत, सत्कार समारंभ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त मनपा आयुक्त अमोल येडगे आणि नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार व स्वागत समारंभ शनिवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी जी. श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पुरुषोत्तम भापकर यांनी २०१३ मध्ये शहराच्या डीपीवर…

Read More

महाराष्ट्र, ओडिशा व बिहारमधून 4 जणांना अटक:पोलिस म्हणाले- खेळण्यांत बॉम्ब लावून हल्ल्याची तयारी करत होते; राम मंदिर, संसद निशाण्यावर होते

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधून चार संशयित व्यक्तींना अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्याकडून IED आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींपैकी दोघे महाराष्ट्राचे, तर प्रत्येकी एक ओडिशा आणि बिहारचा आहे. त्यांची ओळख मोसाइब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इमरान अशी झाली आहे. पोलिसांनुसार, दोन आरोपी रिमोट…

Read More