वेरूळ येथील शहाजीराजे गढीच्या जतन आणि संवर्धनावर विशेष भर:शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत छावा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक
प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी आपले सहकारी श्रीकांत तौर यांच्यासह ही भेट घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण, आमदार…