Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धुळे-सोलापूर महामार्ग -3 ब्लॅक स्पॉटवर 1 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग; 5 ब्लॅक स्पाॅट, 3 वर्षांत 53 अपघात, 39 मृत्यू




अपघातमुक्त रस्त्यासाठी कामाला सुरुवात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत या ठिकाणी ५३ अपघात झाले असून त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ५ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. सध्या ३ ‘स्पाॅट’वर दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सुरू केले आहे. त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ३ ठिकाणी एका उड्डाणपुलाच्या उभारणीबरोबर आणि २ भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत साजापूर फाटा, भांबरवाडी फाटा, अंधानेर फाटा, गल्लेबोरगाव आणि पळसवाडी फाटा हे ५ ब्लॅक स्पॉट समोर आले आहेत. या ठिकाणी सुमारे ९० कोटी रुपये खर्च करून कामे केली जाणार आहेत. साजापूर फाट्यावर उड्डाणपूल, गल्लेबोरगाव व कन्नड येथे भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. लवकर काम पूर्ण होणार ब्लॅक स्पॉटचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे ९० कोटी रुपयांचा खर्च करून १ उड्डाणपूल आणि २ भुयारी मार्गांची निर्मिती करण्यात येत आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. – अनिकेत कुलकर्णी, अभियंता, एनएचएआय वारंवार अपघात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *