Headlines

Admin

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, काल मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट:मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा; आप, TMC, उद्धव गटाच्या MP ना संधी मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची आहे, कारण एक दिवस अगोदर दोन घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. मंगळवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ संपला होता आणि भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही. कुरियन हे अल्पसंख्याक कार्य मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

Read More

9 वर्षांपासून रखडला पालखी मार्ग; 24 मीटरवरून आला 18 मीटरवर:पैठण ते पंढरपूर मार्गाची दयनीय अवस्था; वारकऱ्यांना खडतर प्रवासाची शिक्षा‎

मराठवाड्याच्या संतपरंपरेचा मानबिंदू असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडले आहे. काही ठिकाणी भूसंपादन न झाल्याने आणि शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने प्रकल्प संथगतीने सुरू असला तरीही या रस्त्याची रुंदी आता २४ मीटरवरून १८ मीटर करण्यात आली आहे. त्यातदेखील रस्ता सोलापूर जिल्हा वगळता सर्व ठिकाणी रखडला असल्याचे नाथवंशज पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले…

Read More

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळा पण वाचनासह अभ्यासाकडेही लक्ष द्या:नांदखुर्दे खुर्द जि.प. शाळेत तहसीलदार गोपाल पाटील यांचे मार्गदर्शन‎

शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ अवश्य खेळावेत. पण त्याचवेळी अभ्यासापुरताच मोबाईलचा वापर करून अवांतर वाचनाकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे प्रतिपादन एरंडोलचे तहसीलदार गोपाल पाटील यांनी केले. एरंडोल तालुक्यातील नांदखुर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित ‘शाळापूर्व तयारी अभियानाच्या’ दुसऱ्या मेळाव्याप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या मेळाव्यानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक स्टॉल्स लावण्यात…

Read More

उंडणगाव येथे एकल महिला दिन साजरा:महिलांच्या सन्मान, हक्क व स्वावलंबनासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन‎

ग्रामपंचायत उंडणगाव येथे एकल महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एकल महिलांच्या समस्या, त्यांचे अधिकार व समाजातील स्थान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमामध्ये “सन्मान व हक्क, शिक्षण व कौशल्य विकास, आर्थिक स्वावलंबन व रोजगार, कायदेशीर मदत व शासकीय योजना तसेच…

Read More

दिल्लीत मुलीवर बलात्कार – हत्या, आरोपीला गोळी मारली:पोलिसांचा दावा- पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; रुग्णालयात दाखल

दिल्लीत एका 11 वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मंगळवारी रात्री पोलीस चकमकीत जखमी झाला. पोलिसांचा दावा आहे की, त्याला गुन्हेगारी घटनास्थळाची (क्राइम सीन) पुनर्रचना करण्यासाठी (रीक्रिएट) नेले जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी त्याच्या पायात गोळी मारण्यात आली. सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. पीडित मुलगी फुगे विकायची. ती सोमवारी सकाळी…

Read More

मोहाळ ते उंडणगाव बससेवा सुरू:चालक-वाहकांचा सत्कारः शिक्षणाचा प्रवास सुलभ, ग्रामस्थांनी मानले मंडळाचे आभार‎

मोहाळ येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला असून, विद्यार्थ्यांसाठी मोहाळ ते उंडणगाव अशी एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे सावित्रीबाई फुले कन्या हायस्कूल, उंडणगाव येथे शिक्षण घेणाऱ्या १०० ते ३०० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहाळ येथील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी उंडणगाव येथे ५ किलोमीटर ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सुरक्षित व…

Read More

चारनेर येथे अवैधरीत्या पाणी उपसा:महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाच्या पथकाची कारवाई, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा‎

चारनेर धरणातून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत इलेक्ट्रिक पंप, वीज केबल व पाइप जप्त केले. जप्त करण्यात आलेले साहित्य आमठाणा ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले असून या कारवाईमुळे अवैध पाणी उप . चारनेर धरण हे परिसरातील प्रमुख जलस्रोत असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही या धरणातील पाणीसाठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते….

Read More

लासलगावी शोभायात्रा, महाप्रसाद अन् महेश वंदनेतून भक्तीचा जागर:सत्यनारायण, महापूजा आणि शोभायात्रेतून सामाजिक एकोप्याचा संगम‎

लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात आला. मंगळवारी (२३) सका . नाशिक शहरात रविवार कारंजा येथून मुख्य मिरवणूक निघणार होती, मात्र, ऐन मिरवणुकीच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने मिरवणूक रद्द करण्यात आली….

Read More

केंद्र म्हणाले- इथेनॉलला मुंग्या लागल्याचा VIDEO फेक:पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळण्याची गोष्ट चूक; इंजिन खराब झाल्याचा रिपोर्ट नाही

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल इंधनाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, इथेनॉल मिश्रण योजना वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे असून, त्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसल्या होत्या. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की,…

Read More

दिंद्रुडला हमालांचे कामबंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित:थकीत मजुरी द्यावी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची शासकीय गोदामातील हमालांची मागणी‎

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शासकीय गोदामातील हमाल कामगारांनी कामबंद आंदोलन मंगळवारपासून (२३ जून) सुरू केले आहे. यामुळे गोदामांतर्गत स्वस्तधान्य दुकानांना स्वस्त धान्याचे होणारे वितरण ठप्प झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले आहे. गोदामात आलेल्या धान्याच्या पोत्यांची उठाठेव करण्याची कष्टप्रत काम हमाल करतात. परंतु गेल्या पाच महिन्यांपासूनची त्यांची मजुरी सबंधित यंत्रणेने दिली नाही….

Read More