कृषी विभागाची खत काळाबाजार, साठेबाजीवर मोठी कारवाई:पुणे विभागात 113 परवाने निलंबित/रद्द; 7 गुन्हे दाखल
शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने खताचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण ११३ खत विक्री परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले असून, ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक…