Headlines

Admin

कमर्शियल LPG सिलिंडर 53.50 रुपयांनी महागला:5 किलो एफटीएल सिलेंडरच्या किमतीतही ₹11 वाढ; जूनमध्ये होणारे 4 मोठे बदल

कमर्शियल सिलिंडर आज म्हणजेच 1 जूनपासून 53.50 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. दिल्लीत तो 3113.50 रुपयांना मिळत आहे. 5 किलोच्या FTL सिलिंडरच्या किमतीत 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता ‘छोटू’ सिलिंडरची किंमत 821.50 रुपये झाली आहे. याशिवाय, पेट्रोल, डिझेल आणि ATF वरील नवीन निर्यात शुल्क कपात आजपासून लागू झाली आहे. जूनमध्ये होणारे 4…

Read More

गडचिरोलीत 20 हजार धूररहित चूल वापर, कार्बन उत्सर्जन थांबले:सुधारित चुलींमुळे घरातील प्रदूषण 100 टक्के थांबले

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली या दुर्गम व आदिवासी तालुक्यांत मोठी आरोग्य- पर्यावरण क्रांती आकाराला आली आहे. या भागात तब्बल २० हजार धुररहित सुधारित चुलींचे वितरण पूर्ण करण्यात आले. यातूनच हे शक्य झाले आहे. क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणारा ठरत आहे….

Read More

दुचाकीला पिकअपची धडक; धोंडे‎जेवणानंतर परतणारे 2 शिक्षक ठार‎:सेनगाव शहराजवळ मध्यरात्री अपघात‎

सेनगाव शहराजवळ भरधाव‎पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने‎दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना‎शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या‎सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक‎सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण‎येथील रहिवासी होते. दोघे शिक्षक‎धोंडे जेवणासाठी रिसोडला गेले‎होते, परत येताना अपघात झाला.‎ वरूड चक्रपाण येथील शिक्षक‎संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे‎शनिवारी जनगणनेचे कर्तव्य पार‎पाडून, रिसोड येथे पाहुण्यांकडे‎भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी‎पाहुण्यांना भेटून, धोंडे जेवणानंतर‎दुचाकीने परत…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आधी ट्रॅक्टर ड्रायव्हर, आता रेशीम शेतीवर वार्षिक 25 लाख कमाई; अकोल्यातील शेतकऱ्याची रेशीम कोष अन् तुती रोपांची विक्री

पारंपरिक आणि कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीला फाटा देऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली, तर शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता करोडोंची उलाढाल करणारा उद्योग बनू शकते, हे अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील प्रगतीशील शेतकरी पांडुरंग गिऱ्हे यांनी सिद्ध करून दाखवले. एकेकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवणारे पांडुरंग आज रेशीम कोष व तुती रोपांच्या विक्रीतून…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण…

Read More

Madhuri Dixit Defends Aishwarya Rai Body Shaming at Cannes 2026

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकवरून सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगवर अभिनेत्री माधुरी दीक्षितने आक्षेप घेतला आहे. न्यूज एजन्सी PTI शी बोलताना माधुरी म्हणाली की, ऐश्वर्या एक ग्लोबल स्टार आहे आणि तिने माजी मिस वर्ल्ड म्हणून देशाचे नाव उज्वल केले आहे. कोणत्याही महिलेचे यश तिच्या वजन,…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांत झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अडीच…

Read More

जायकवाडी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू:खोलीचा अंदाज चुकला अन् काळाने घातली झडप, सुट्टीचा बेत ठरला जीवघेणा

जायकवाडी धरण परिसरात रविवारी (दि. 31) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली, धरण पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सात मित्रांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबिका नगर, मुकुंदवाडी परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका नगर (मुकुंदवाडी) येथील सात युवक रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि जायकवाडी धरण परिसर पाहण्यासाठी…

Read More

मधाळ स्वरांच्या 'सुमन' सुगंधाचा शेवट:ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय संगीतसृष्टीला आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी सहा दशकांहून अधिक काळ समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे आज, ३१ मे २०२६ रोजी मुंबईत दुःखद निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका दैवी आणि सुरेल युगाचा अंत झाला असून, संगीतप्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे….

Read More

अनिकेत तटकरेंसाठी युती धर्म पाळा:एकनाथ शिंदेंच्या आपल्या आमदारांना सूचना, कोकण विधान परिषदेची जागा गेली राष्ट्रवादीकडे

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला पेच अखेर सुटला असून, प्रतिष्ठेची मानली जाणारी कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, “युतीधर्म पाळा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणा,” अशा कडक सूचना आपल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत….

Read More