दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:नाशिक म्हाडा प्रकरण, अधिकारी तुरुंगात तरी निलंबनास टाळाटाळ; 10 दिवसांपासून काजळे, पाटील गजाआड
म्हाडा फसवणूक प्रकरणी पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील आणि महसूलचे नायब तहसीलदार नितीन पाटील या अधिकाऱ्यांना गजाआड केले आहे. 10 दिवस उलटूनही त्यांचे अद्याप निलंबन न केल्याने प्रशासकीय कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शासकीय नियमांनुसार, कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्यास तो निलंबित मानला…