Headlines

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी रिपब्लिकनचा महामोर्चा:जातीय जनगणनेनंतरच उपवर्गीकरण करावे, अन्यथा समाजात फूट पडेल अशी भूमिका

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय राष्ट्रीय जातीय जनगणनेतील अचूक आकडेवारीनंतरच घेण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी, २७ जुलै रोजी पुण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या मते, घाईघाईने घेतलेला निर्णय समाजात अंतर्गत फूट पाडू शकतो आणि अनेक समाजघटकांवर अन्याय करू शकतो. हा महामोर्चा सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

Read More

मुंबईतील पवईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात:चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली, 7 प्रवासी जखमी

पवई परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक मोठी अपघात घडली. विक्रोळी आगारातून वांद्रे बस स्थानकाकडे (पश्चिम) जात असलेल्या ‘बेस्ट’च्या एका इलेक्ट्रिक बसची रस्ता दुभाजकाला (Road Divider) जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात बसमधील किमान ७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘बेस्ट’च्या ट्रॅफिक कमांड अँड कंट्रोल…

Read More

राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप:म्हणाले- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, 'सात-बारा कोरा'चा दावा फोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर गंभीर टीका केली आहे. ही योजना शेतकऱ्यांची फसवणूक असून, ‘सात-बारा कोरा’ करण्याच्या दाव्याचा फुगा फुटल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ २ लाख रुपये आणि…

Read More

Aditya Thackeray & Amit Thackeray Joint Press Conference

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 26 जुलैच्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, हा . जिथे ठाकरे आहेत, तिथे आम्ही सुरक्षित आदित्य ठाकरे म्हणाले की, अनेक विद्यार्थी त्यांना सांगत आहेत की, “जिथे ठाकरे…

Read More

Uddhav Thackeray Criticizes Judiciary And Central Government

ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली. “न्यायालयाला कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे; . उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही. दिल्लीत आंदोलनस्थळी गेल्यानंतर त्यांना विविध राज्यांतून आलेले नागरिक भेटले. त्यापैकी एका तरुणाने…

Read More

Mumbai Police Drug Threat Video Controversy; Raj Thackeray Slams Officials

तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्हांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा प्रकार काँग्रेसने समोर आणला आहे. त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केलाय. मुंबई काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तरुणांना इकडे . एकीकडे नवी दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात आंदोलन करणारे कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र…

Read More

विजय वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात:म्हणाले- चोरांच्या उलट्या बोंबा! नीट पेपर तुम्ही फोडला अन् आंदोलनही तुम्हीच करता?

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान काल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नेत्यांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी लोकशाही नव्हे तर हुकूमशाही असल्याचे म्हटले. तसेच, काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपने केलेल्या आंदोलनाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला असून,…

Read More

भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे उघड:100 रुपयांचे चिंचोके विकले लाखोंना, भक्तांच्या पॅन-आधारचा गैरवापर करून उघडली बोगस खाती!

स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेत भाविकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुमारे 42 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, तपासादरम्यान त्याचे अनेक धक्कादायक आणि हादरवणारे कारनामे समोर आले आहेत. अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने भाविकांची केवळ आर्थिक लूटच केली…

Read More

आंदेकर टोळीला मोक्का अंतर्गत 5 दिवसांची पोलिस कोठडी:वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील तीन आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि हर्षल वाडेकर अशी या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात अक्षय ऊर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पत्नीने सहकारनगर…

Read More

नाशिकमध्ये पावसाचा कहर:गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी; अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून रामकुंड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. गोदाघाटावरील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. याच दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने रात्रभर…

Read More