Headlines

संत परंपरेने दिली समता, बंधुभाव अन् सेवाभावाची शिकवण:आषाढी एकादशीनिमित्त शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भक्तिमय वातावरणात निघाली दिंडी‎

“विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्ये रुजविणारे दिंडीसारखे उपक्रम काळाची गरज आहेत. संत परंपरेने समाजाला समता, बंधुता आणि सेवाभावाची शिकवण दिली आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शाळा आणि पालकांनी संयुक्तपणे पार पाड . ते म्हणाले, आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यामध्ये चांगले संस्कार, सामाजिक जबाबदारी…

Read More

बीडीओंच्या कक्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांडला ठिय्या:पालकमंत्र्याच्या दालनात डेरा देऊन बेघर झोपडी आंदोलनाचा इशारा‎

घरकुल लाभार्थींची २०२२ पासून प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी. मंजूर घरकुल बांधकाम करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या पैशाचे त्वरित वितरण करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी २३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते गटविकास अधिकारी पंचायत समिती मोर्शी यांच्या कार्यालयात धडकले. त्यांनी चक्क गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात शिरून…

Read More

NEET प्रकरणी सरकार गंभीर:फास्ट ट्रॅक कोर्टपासून विद्यार्थ्यांशी संवादापर्यंत मुरलीधर मोहोळांनी मांडली भूमिका, काँग्रेसवर टीकास्त्र

नीट पेपरफुटी प्रकरण, त्यानंतर झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि काँग्रेसची भूमिका यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेतला आहे. सरकारने पेपरफुटी प्रकरणात तातडीने सीबीआयची एसआयटी नेमली असून आतापर्यंत १३ जणांना गजाआड केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर मोहोळ यांनी टीका केली…

Read More

कोरलेल्या आभूषणांनी उजळले विठ्ठल मूर्तीचे सौंदर्य:संशोधकांच्या अभ्यासातून मूर्तीचे प्राचीन वर्णन, सावळा विठुराया वारकऱ्यांचे जीवनसर्वस्व

पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरात विराजमान असलेले सावळे परब्रह्म श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सौंदर्य, तिची जडणघडण आणि वैशिष्ट्ये नेहमीच भाविकांसाठी औत्सुक्याचा विषय राहिली आहेत. संशोधकांनी समक्ष केलेले निरीक्षण व महापूजेच्या वेळी पुजाऱ्यांकडून सांगितले जाणारे वर्णन यांवरून मूर्तीची सविस्तर रूपरेषा संशोधनाचा विषय आहे. विठ्ठलाचे हे रूप अत्यंत प्राचीन, शिल्पशास्त्राच्या दृष्टीने अद्वितीय व भक्तिभावाने नटलेले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक…

Read More

बंदला अकोट शहरात संमिश्र प्रतिसाद:देवरी फाट्यावर रस्तारोको; वाहतूक ठप्प, पोलिसांच्या मध्यस्तीने मार्ग मोकळा‎

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोट शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात आंदोलक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. त्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून फिरत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. मात्र आंदोलक पुढे गेल्यानंतर दुपारपर्यंत बहुतांश बाजारपेठा पुन्हा…

Read More

शहरात आजपासून हेल्मेटची सक्ती कडक:दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता अनिवार्य : खरेदीसाठी वाहनधारकांची लगबग‎

रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये जाणाऱ्या निरपराध नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारपासून (दि. २४) शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चालक आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या (पिलियन रायडर) हेल्मेटचा वापर करणे कायदेशीररित्या अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो,…

Read More

"इस्तीफा दो…’च्या घोषणांमुळे दणाणले रस्ते‎:काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर‎

दिल्ली येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याचे आज, गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही अमरावतीत पडसाद उमटले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धरणे, निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो…’ विद्यार्थीयोंको न्याय दो…नरेंद्र मोदी हटाव-देश बचाव…अशा संतप्त आणि जोशपूर्ण घोषणांनी शहरातील जयस्तंभ चौक व संपूर्ण मार्केट परिसर दणाणून गेला होता. वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,…

Read More

यंदा एमबीबीएसचे 100 प्रवेश अधांतरी:राज्य सरकारला केंद्राला द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र, यावर्षी प्रवेशाची शक्यता धुसर‎

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे ६ मे २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली. या निर्णयानंतर यंदाच १०० एमबीबीएस प्रवेश सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, आवश्यक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भरती न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) मनुष्यबळ अपुरे असल्याचे नमूद करत सलग दुसऱ्यांदा…

Read More

नवपिढीने गुरु-शिष्यांच्या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे:चांदोरी येथे प्राचार्य डॉ. माधव देवरे यांचे प्रतिपादन‎

चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव (तात्यासाहेब) बोरस्ते आणि दानशूर काकुशेठ उदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव देवरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुरेश भोज प्रमुख अतिथी…

Read More

कन्नड शहरात पहाटे तीन‎तास मुसळधार पाऊस‎:रस्त्यावर पाणी, पालिकेने रस्ता केला मोकळा

कन्नड शहरात बुधवारी (दि.२२) पहाटे तीन ते सहा वाजेरदरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहरातील जवाहर कॉलनी, मोमीनपुरा, म्हाडा कॉलनी, त्रिशरण बुद्धविहार, सुंदर कॉलनी या वसाहतीकडे जाणारा रस्ता जलमय होऊन नागरिकांचे दळणवळण ठप्प झाले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगराध्यक्ष फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद, बंटी सुरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर रस्ता मोकळा…

Read More