Headlines

कात्रज बोगद्याजवळील संजय देशमुख हत्या प्रकरण:23 वर्षांच्या मुलाने मित्रांच्या मदतीने घेतला वडिलांच्या खुनाचा बदला, 4 जणांना अटक, पिस्तूल जप्त

वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांच्या मुलाने साथीदारांच्या मदतीने एकाचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त…

Read More

जनाबाई, गाडगेबाबा अन् चक्रधर स्वामी तीर्थक्षेत्रांसाठी 115 कोटींचा निधी मंजूर:गंगाखेड आणि काटोल भागात स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगारासही बळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील तीन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटी ५ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर् . सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन सर्व कामे उच्च दर्जाची…

Read More

आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत:नीट आंदोलक विद्यार्थ्यांसाठी रितेश-जिनेलिया देशमुखची पोस्ट

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता अधिक आक्रमक रूप धारण केले आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. ‘आम्ही तरुणांच्या पाठीशी…

Read More

राज्य वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर, बुलढाण्याच्या विद्यार्थ्यांचे यश‎:विजेत्यांना 11 हजारांचे पारितोषिक‎

श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमार्फत आयोजित राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. साईबाबांचे जीवनचरित्र, त्यांची शिकवण, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची आवड निर्माण करून उत्कृष्ट वक्ते घडवणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष…

Read More

तिवसा येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद:ऑपरेशन कवच अंतर्गत व्यसनमुक्त समाज घडवण्याचा दिला संदेश‎

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ”ऑपरेशन कवच” मोहिमेअंतर्गत तिवसा पोलीस स्टेशन तसेच या.द.व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक योगेश देशमुख, छाया दंडाळे, हेमंत निखाडे, संदीप दहाट, संदीप चक्रनारायण…

Read More

पेपरफुटी, भरती घोटाळे, परीक्षेतील त्रुटींविरोधात आंदोलन:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर केले धरणे

नीटसह अन्य पेपरफुटी, भरती घोटाळे व ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त शासनाला निवेदन पाठवण्यात आले. . सातत्याने घडणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी, शासकीय भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी, पोलिस भरतीतील अनियमितीचा उल्लेख आंदोलनात करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष…

Read More

वेध गणेशोत्सवाचे:पीओपी, मजुरी वाढीने गणेशमूर्तींचे दर 30% महागणार

यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक खर्च करावा लागणार आहे. पीओपी, रंग, सजावटीचे साहित्य आणि कारागिरांच्या मजुरीत झालेल्या वाढीमुळे गणेशमूर्तींच्या किमती सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार आहेत. अकोल्यातील मूर्तीकारांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण केले असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून रंगकामाला वेग येणार आहे. यंदा पीओपीच्या दरवाढीमुळे मुर्तींच्या किमतीत…

Read More

हिपॅटायटीस जनजागृती वॉकेथॉनमधून शहरामध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश:फिट अमरावती, सुदृढ अमरावतीचा संदेश देत नागरिक झाले सहभागी‎

हिपॅटायटिससारख्या गंभीर यकृतविकाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी शहरात रविवार, १९ रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट, डॉ. अंजली कविमंडन मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेत “फिट अमरावती, सुदृढ अमरावती”चा संदेश दिला. ऑनलाईन पूर्वनोंदणीच्या…

Read More

वारी विठ्ठलाची:पंढरपुरात अवतरला भक्तीचा मेळा; डोळे दीपवून गेला देवगडचा रिंगण सोहळा

आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर, नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीचे विठुरायाच्या पंढरपूर नगरीत अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात आगमन झाले. सोमवारी सकाळी पंढरपूरच्या चौकाचौकात या प्रदक्षिणा दिंडीचे स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. देवगड संस्थानच्या पंढरपूर मठात रंगलेला…

Read More

वृक्षारोपण अन् संवर्धनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज:केडगावात वृक्षारोपण मोहिमेला मिळाला प्रतिसाद‎

कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचे खरे महत्त्व संपूर्ण जगाने अनुभवले. त्या काळात कृत्रिम ऑक्सिजनसाठी मोठा खर्च करावा लागत होता तर ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, वृक्ष आपल्याला चोवीस तास मोफत नैसर्गिक ऑक्सिजन देतात. कोरोनानंतर वृक्षांचे महत्त्व सर्वांना पटले असले, तरी समाजात अजूनही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन…

Read More