Headlines

सर्व घटकांना न्याय, विकास, सन्मानासाठी कटिबद्ध:कासोद्यात शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यात आमदार ॲड. अमोल पाटील यांचे प्रतिपादन‎

तालुक्यातील कासोदा येथे श्री महादेव मंदिर, गरीब नवा चौक परिसरात आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे शाल व…

Read More

गंगापूर-वैजापूर रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात; एक ठार:अपघातात गंभीर जखमी एकावर रुग्णालयात उपचार सुरू‎

गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील जाखमाथा परिसरात सोमवारी सकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात व्यावसायिक दीपक हरीभाऊ डोंगरे (४०) यांचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेत दुसरी दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक डोंगरे हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कुटीने वैजापूरच्या दिशेने जात होते. विठ्ठल आश्रमाजवळील जाखमाथा…

Read More

3 दिवसांत नाशिकमध्ये दुसरे हत्याकांड:आर्थिक विवंचनेतून नाशिकला पत्नी व 7 वर्षीय मुलाच्या हत्येनंतर पतीचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

जेलरोड परिसरातील अरिंगळे चाळीत आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या पतीने पत्नी आणि अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर पतीने स्वतः विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्या . गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड आर्थिक अडचणीत होता. याच विवंचनेतून रविवारी मध्यरात्री त्याने झोपेत असलेल्या पत्नी व मुलाचा चाकूने…

Read More

वर्धा चिमुरडी अत्याचार प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात…

Read More

गर्भलिंग निदान कायद्यासाठी कार्यप्रणाली तयार करा – नीलम गोऱ्हे:पुणे, सातारा, सोलापूरमधील बेकायदेशीर प्रकरणांवर बैठकीत सूचना

विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वय साधून कार्यप्रणाली तयार करावी, असे प्रतिपादन केले. ही कार्यप्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणांवर विधानपरिषदेत अल्पकालीन…

Read More

दहा दिवसांच्या खंडामुळे अमरावतीत पाऊस 37 टक्क्यांनी घटला:शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर काहींची पेरणी अजूनही रखडली आहे. २० जुलैपर्यंतच्या अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी ३२४.७ मिमी अपेक्षित असताना,…

Read More

शैक्षणिक कागदपत्रांसाठी आलेल्या महिलेला मारहाण:निवृत्त ACP सुनील पवारसह 8-10 महिला बाऊन्सर्सवर गुन्हा

बालेवाडी येथे शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या विवाहितेला घरात प्रवेश नाकारून मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, त्यांची पत्नी सुप्रिया पवार आणि ८ ते १० अज्ञात महिला बाऊन्सर्सविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बाणेर पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इशिका प्रतीक पवार (३०) या १४…

Read More

पुणे शहरात जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू:पावसाळ्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे शहरात पावसाळ्यात जड वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने अडकून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जड आणि अवजड वाहनांनी पुणे शहरात प्रवेश न करता…

Read More

पालघरमध्ये थरारक दरोडा:भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले; सोने पोत्यात भरून चोरटे पसार; VIDEO

पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या या टोळीने दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने गोळा करून एका पोत्यात भरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गजबजलेल्या भागात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे डहाणूसह संपूर्ण परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये तीव्र भीतीचे…

Read More

कन्हान मेट्रो विस्ताराला राज्य शासनाची मंजुरी:310 कोटींच्या प्रकल्पाची अंमलबजावणी 'महामेट्रो' करणार

नागपूर मेट्रो रेल टप्पा-2 अंतर्गत कन्हान नदी मेट्रो स्थानक ते कन्हान शहरादरम्यानच्या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत केली जाईल. या विस्तारासाठी एकूण 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहरादरम्यान सुमारे 1.40 किलोमीटर लांबीचा पूर्णतः उन्नत…

Read More