दिव्य मराठी एक्सपोझ:डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात ओढून तरुणांचा शारीरिक छळ, लूटही, ‘शिकार’ हेरण्यासाठी साेलापुरात टोळी सक्रिय
डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणारी आणि त्यांची लूटमार करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. बदनामीच्या भीतीचा अस्त्र म्हणून वापर करत, या टोळीने अनेक तरुणांना आपला शिकार बनवले आहे. मात्र, नुकत्याच एका पीडित तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे विजापूर नाका पोलिसांनी या टोळीतील 5 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजात बदनामी होईल, या दहशतीखाली अनेक तरुणांनी अन्याय…