Headlines

सोयाबीन न उगवल्याच्या 197 तक्रारी:पावसाच्या आगमनामुळे खरिपाची 57% पेरणी पूर्ण; उगवण न झाल्याने शेतकऱ्यांसमाेर आर्थिक संकट‎

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला असून आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या ५७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. तरीही, पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने (जर्मिनेशन प्रॉब्लेम) शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण १९७ तक्रारी आल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच १,१८,७६५.७ हेक्टरवर पेरणी…

Read More

आरक्षणाच्या रक्षणासाठी लढणार; संवैधानिक हक्कासाठी करणार संघर्ष:उपवर्गीकरण विरोधी संघर्ष परिषदेत व्यक्त करण्यात आला निर्धार‎

शहर काँग्रेस कमिटी व समाज क्रांती आघाडीच्या संयुक्त विद्यमाने उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण, संवैधानिक हक्क अबाधित राखणे, उपवर्गीकरणाच्या विरोधात जनजागृती करणे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते. परिषदेच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाच्या संरक्षणासाठी, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या…

Read More

नमुना गल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गॅस सिलिंडरला आग:घरापर्यंत जाण्याचा मार्ग अरुंद, अग्निशमन विभागाची तारांबळ‎

शहरातील नमूना गल्ली क्र. ५, काळे हॉस्पीटलजवळ असलेल्या घरातील सिलिंडरला भीषण आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. विशेष बाब अशी की, वरच्या मजल्यावर ही आग लागली तेथे विद्यार्थी राहात होते. बरे घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अरुंद असल्याने अग्निशमन विभागाला आगीपर्यंत पोहोचणे सहज शक्य होत नसल्याने जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर…

Read More

राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भाला विश्रांती! तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी…

Read More

33 पालख्या अन् 204 दिंड्याचे माढा तालुक्यामध्ये होणार स्वागत:मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैष्णवांच्या मेळ्यासाठी सज्ज; कुर्डुवाडीत भाविकांची लगबग

कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या कुर्डुवाडी शहरात व परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंड्या पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी तालुका व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारी आता काही दिवसांवर आली असून माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ३३ पालख्या व २०४ दिंड्यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय यंत्रणा…

Read More

भूकंपाच्या सलग 4 धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला:शिरली परिसरात 4.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे नागरिकांची रात्र जागून, अनेक घरांना तडे

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ता. 9 पहाटे अवघ्या दोन तासात चार भूकंपाच्या धक्याने जिल्हा हादरला असून शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6…

Read More

आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड:जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर . पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रिद्धी-सिद्धी गणपती दर्शन रांगेत साधारण १० ते १२ पत्राशेड उभारले जातात. परंतु, यंदा…

Read More

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

बागलाण फाउंडेशनची पंढरपूर सायकल वारी‎:9 ते 11 जुलैदरम्यान 51 सायकलपटूंचा 410 किमी प्रवास‎

आषाढी एकादशीनिमित्त बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने ९ ते ११ जुलै या कालावधीत सटाणा ते पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली. यावर्षीच्या सायकल वारीत एकूण ५१ सायकलपटू सहभागी होणार आहे. सुमारे ४१० किलोमीटरचा…

Read More

ना सुविधा, ना देखरेख; कावसानकर स्टेडियम अतिक्रमणाच्या विळख्यात:शहरातील स्टेडियम परिसराला अतिक्रमणाचा विळखा‎

ग्रामीण भागातील गुणवंत आणि गरजू खेळाडूंना स्थानिक पातळीवरच दर्जेदार व आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पैठण येथे कावसानकर स्टेडियम उभारण्यात आले आहे. मात्र, हे स्टेडियम प्रशासकीय अनास्थेमुळे गैरसोयीचे बनले आहे. आज ना नियमित देखरेख आहे, ना खेळाडूंसाठी आवश्यक मूलभूत सुविधा. त्यातच आता स्टेडीयम परिसराला बेकायदेशीर अतिक्रमणाने वेढल्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परिसरातील अतिक्रमणे…

Read More