नांदूर मधमेश्वरमधून 18,403 क्युसेकने आवक:गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात केवळ 10 मिलीमीटर पावसाची नोंद
पैठण नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १८ हजार ४०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या जलाशयात दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होईल,…