बचतगटांमुळे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण- गडाख:गणेशवाडीत महिला बचतगट मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
बचतगटांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत होते. बचतगटातील प्रत्येक महिला दरमहा ठराविक रक्कम जमा करते. या जमा झालेल्या निधीतून गरजू महिलांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच चांगल्या प्रकारे कार्यरत असलेल्या बचत गटांना बँकांकडून विनातारण कर्जही मिळते. या कर्जाच्या माध्यमातून महिला जोडधंदे व लघुउद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात,…