Headlines

बिल्डरच्या नोटिसीत भुजबळांच्या बंगल्याचे नाव:जागा मालकाला भेटण्यासाठी सातपुड्यावर बोलावले, दमानियांची चौकशीची मागणी

मुंबईतील एका पुनर्विकास प्रकल्पाच्या जाहीर नोटिसीत थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मलबार हिल येथील अधिकृत ‘सातपुडा’ शासकीय बंगल्याचा पत्ता देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेत, “हा सरकारी मालमत्तेचा खाजगी फायद्यासाठी केलेला गैरवापर आहे,” अशी टीका केली आहे. याप्रकरणात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप…

Read More

यवतमाळचा आंतरजिल्हा चोरटा वाठोडा पोलिसांच्या जाळ्यात:सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

वाठोडा पोलिसांनी मध्यरात्री एका घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडला. ‘नाकाबंदी ॲप’च्या मदतीने त्यांनी एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला मुद्देमालासह रंगेहात अटक केली. सुशांत अशोक थूल (वय 30, रा. शिवाजी नगर, राळेगाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना काल रात्री वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदसागर लॉन, माँ चंडिका नगर भागात घडली. बीट मार्शल…

Read More

'साहेब, निर्णय घ्या!':नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचे पोस्टर चर्चेत; राज्यसभा उमेदवारी गेल्यानंतर नाराजी उफाळली

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात “साहेब, निर्णय घ्या” अशा आशयाचे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ समर्थकांमध्ये अस्वस्थता…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत 43 अर्ज अवैध:संजना जाधव, समीर सत्तार, अण्णासाहेब माने यांचे अर्ज बाद, अब्दुल सत्तारांना मोठा झटका

700 कोटींची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत. मनपा, जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेने निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. यातच शिवसेनेच्या आमदार संजना…

Read More

अशोक खरात प्रकरणाचे पडसाद परदेशातही:नायजेरियासह अनेक देशांत व्हिडिओंचा प्रसार, सायबर पोलिसांची मोठी कारवाई

नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रांचा प्रसार परदेशातही झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या अनेक खात्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. 406 हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या तपासात अशोक खरात प्रकरणाशी…

Read More

विधान परिषद निवडणूक:मतफुटी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांची गोवा वारी, संपूर्ण 'टूर प्लॅन' समोर; काँग्रेसच्या दाव्याने वाढली धाकधूक?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत भाजपची मते फुटू नयेत (क्रॉसव्होटिंग रोखण्यासाठी) आणि पक्षाचे सर्व नगरसेवक एकसंघ राहावेत, यासाठी भाजपने तगडी तटबंदी उभारली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजप नागपूर महानगरपालिकेतील आपल्या सर्व नगरसेवकांना तब्बल तीन दिवस गोव्याला नेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. नागपूरच्या स्थानिक…

Read More

90 वर्षांच्या आजीची मोठी कायदेशीर लढाई!:नातू-पणतूंना दिलेली जमीन परत मिळवली, बक्षीसपत्र अन् फेरफार रद्द; लातूरमधील प्रकरण

वृद्धत्वाकाळात मुलांकडून किंवा नातवंडांकडून संगोपन आणि देखभालीची अपेक्षा ठेवून हक्काची जमीन नावावर करणाऱ्या एका ९० वर्षीय आजीला प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. संपत्ती नावावर करून घेतल्यानंतर आजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नातू आणि पणतूला लातूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जोरदार चपराक दिली आहे. लातूर तालुक्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पणतूच्या नावावर केलेले आठ एकर जमिनीचे बक्षीसपत्र…

Read More

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!:विखे पाटलांच्या बंगल्यावर ठिय्या; आश्वासने तातडीने पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांत ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे…

Read More

लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार आक्रमक:म्हणाले- उद्या योजना गुंडाळली तरी आश्चर्य नाही, उज्ज्वलातील सिलिंडरची संख्या कमी केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप करत, निवडणुका संपल्यानंतर सरकार योजनांच्या लाभार्थ्यांवर निर्बंध आणत असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या आधी 12 वरून 9…

Read More

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम:म्हणाल्या- मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व शक्यतांना फेटाळून लावले. राज्यसभा उमेदवारीसंदर्भातील पडद्यामागील घडामोडींवरही त्यांनी प्रथमच भाष्य केले. सोशल मीडियावर पोस्ट करत नवनीत राणा…

Read More