Headlines

डॉ. शेषराव पाटील यांच्या 'रानफुले' काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते

पुणे येथे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांच्या ‘रानफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते, असे मत व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिवस आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यविश्व प्रकाशनने वनभवन, गोखलेनगर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन…

Read More

मराठी मुलांना जेल अन् 'भैय्या' निरुपमला सुरक्षा?:रिक्षाचालक मराठी शिकायला तयार, मग संजय निरुपमच्या पोटात का दुखतंय?- संदीप देशपांडे

संजय निरुपमसारख्या भैय्याला मराठी पोलिस का पाठिंबा देतात हे न उमजण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहेत त्यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे, त्यांच्या विचारांचे सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैय्या निरुपमला पाठिंबा देणारे हे कोणते सरकार आहे? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप…

Read More

पुण्यात सलूनमध्ये गोळीबार; वारजे हादरलं, दोन जखमी:धक्कादायक प्रकार; गर्दीत गोळ्या झाडून दहशत, गुन्हेगारांचा थैमान!

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. वारजे परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका सलूनमध्ये काही अज्ञात तरुणांनी घुसून गोळ्या झाडल्याची घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार जण…

Read More

बागेश्वर बाबांचे वक्तव्य गाजले:शिवराय-रामदास स्वामींचा किस्सा सांगितला; म्हणाले- चार मुलं जन्माला घाला आणि एक संघासाठी द्या

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात मोठी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित कार्यक्रमात भारतदुर्गा…

Read More

Shivaji Maharaj History Row; Amol Mitkari Criticizes Bageshwar Dham

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी शास्त्रींवर जोरदार टीका करत त्यांच्या विधानांना चुकीचा इतिहास ठरवले आहे. शिवाजी महाराजांबद् . अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. त्यांनी म्हटले की, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्रात येऊन छत्रपती…

Read More

धारावी प्रकल्पात फडणवीसांचा गेमचेंजर निर्णय:घरांचा आकार दुपटीकडे, 300 वरून थेट 500 चौ. फूट; चाळ-इमारतीधारकांना भेट

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाळ, इमारती आणि अधिकृत सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बिगर-झोपडपट्टी रहिवाशांना आता पुनर्वसनात मोठ्या घरांचा लाभ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावामुळे घरांचा आकार वाढणार असून रहिवाशांच्या राहणीमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन प्रस्तावानुसार, पात्र नागरिकांना किमान 370 चौरस फूट कार्पेट…

Read More

गुरूकुंज मोझरी गावामधून जाणारी पहाटेची अमरावती-गोंदिया बस बंद:दररोजच्या प्रवाशांचे होतायेत हाल, बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी‎

गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती-नागपूर-गोंदि या ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील असंख्य प्रवाशांचे हाल होत असून, संतप्त प्रवाशांनी मोझरी बसस्थानक व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती,…

Read More

वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य:निषेध करून तहसीलदारांना दिले निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी होत असल्याचा आरोप करत समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने तहसीलदार अंकिता दहिभाते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा…

Read More

तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन‎

जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासून काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तसेच ३ कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा…

Read More

लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांवर नजर:बाजार समिती परिसरात कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या, गुन्हेगारीला आळा बसणार‎

मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापार पेठेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. त्यामुळे येथील चोऱ्या, गुन्हेगारीचे चित्रीकरण फुटेज थेट पोलिसांच्या तपासकामासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडून संपूर्ण अडत व्यापार पेठेत चहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे…

Read More