बंदी असतानाही अंजनगाव तालुक्यात एचटीबीटी बियाणे लागवडीचा इशारा:शेतकरी संघटनेने दिले प्रशासनाला निवेदन, दुटप्पी धोरणाचा आरोप
तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. . शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे…