तोतया पत्रकाराने लोहमार्ग निरीक्षकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी:धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न; मुजम्मील शेखवर गुन्हा दाखल
पत्रकार असल्याचे सांगून लोहमार्ग पोलिस निरीक्षकांना धमकावत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तोतया पत्रकार मुजम्मील शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हा ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’चा पत्रकार असल्याचे सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस मुख्यालय, खडकी येथे कार्यरत पोलिस निरीक्षक भगवान विजयराव टोणे (वय 57) यांनी फिर्याद दिली…