Headlines

7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक:शहरात 30 दिवसांत चौथी घटना, शहर लोन माफियांच्या रडारवर

व्यवसाय विस्तारासाठी १५ दिवसांत ७ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून हर्सूल येथील प्रिंटिंग प्रेस उद्योजक प्रकाश रोहिणीकर यांना १ कोटी ९ लाख ८५ हजार १०० रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी ११ ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात ८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्थानिक मध्यस्थ असलेल्या धर्मेंद्र झा (४२) यास अटक करण्यात आली असून…

Read More

तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद:बीड शहरालगत जुन्या वादातून 3 राउंड‎ गोळीबार; दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न‎, एक गंभीर, दोन अटकेत; 5 फरार‎

बीड शहरालगतच्या इमामपूर रस्ता‎परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ‎जुन्या वादाच्या कारणावरून थरारक‎गोळीबाराची घटना घडली. “तू‎आमच्याकडे काय बघतोस?” असा‎जाब विचारत झालेल्या‎बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून‎तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात‎फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला‎असून या प्रकरणी दोन आरोपींना‎गजाआड केले आहे.‎ फिर्यादी शेख मोहम्मद साद (२२, रा.‎जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी‎तक्रार दिली. त्यावरून सफवान खान,‎सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर‎६ ते…

Read More

५ दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:छत्रपती संभाजीनगरात युनायटेड फोरमच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन

छत्रपती संभाजीनगर येथे बँक कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी जालना रोडवरील बँक ऑफ इंडिया कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कामाचा ताण, मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यासाठी ही मागणी तात्काळ मान्य करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. या आंदोलनात शहरातील विविध बँकांचे शेकडो कर्मचारी…

Read More

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती:आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकारचा पाठपुरावा; मंत्री शंभूराज देसाईंची माहिती

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू असून, आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ…

Read More

बीपीसीएलचा 300 टन कचऱ्यावर स्वखर्चाने बायोगॅस प्रकल्प:माती परीक्षणास महापालिकेची परवानगी; 1672 कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) पुणे महापालिकेला दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून संपीडित बायोगॅस (सीबीजी) निर्मितीचा प्रकल्प स्वखर्चाने उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून देण्याची अट ठेवली आहे. यामुळे याच क्षमतेच्या प्रकल्पासाठी महापालिकेने २० वर्षांसाठी १ हजार ६७२ कोटी रुपये खर्चाची काढलेली निविदा चर्चेत आली आहे. महापालिकेने नुकतीच ३००…

Read More

Ashok Toshniwal Honored With Best Rotarian Award 2026

समाजसेवा आणि उत्कृष्ट नेतृत्वाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे येथील ज्येष्ठ रोटरी सदस्य रो. अशोक तोष्णीवाल यांना रोटरी जिल्हा 3132 च्या 2025-26 या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘सर्वोत्कृष्ट रोटेरियन’ (Best Rotarian of District 3132) पुरस्कार प्रदान करून गौरव . संपूर्ण मराठवाडा विभाग, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा अशा 11 महसूल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या रोटरी जिल्ह्यात 104 हून…

Read More

नांदेडमध्ये शिवसेनेला मोठे बळ:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना त्यांच्या पाठीशी शिवसेना आणि आपण स्वतः ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव…

Read More

मुंबईत ड्रग्ज विकताना पोलिसाला रंगेहाथ अटक!:जोगेश्वरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलला 5 ग्रॅम 'एमडी'सह ठोकल्या बेड्या

देशातील सर्वात कार्यक्षम आणि नावाजलेल्या पोलिस दलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लावणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणात मालवणी पोलिसांनी धडक कारवाई करत, मुंबई पोलिस दलातील किरण इंदुलकर या कॉन्स्टेबलला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात किरण इंदुलकर याला 5 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) म्हणजेच ‘म्याव-म्याव’ या अमली पदार्थाची विक्री…

Read More

दरोड्याच्या तयारीतील 5 गुन्हेगारांना अटक:नागपुरात 4.82 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक साथीदार फरार

नागपूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने अटक केली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना घोरपड रोडवरील कृष्णा डेव्हलपरच्या मोकळ्या शिवारात काही संशयित घातक शस्त्रांसह दरोड्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती….

Read More

शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरण:सर्वोच्च न्यायालयात सलग चौथ्या दिवशी सुनावणी; 'विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ पक्ष' मुद्द्यावर घमासान

एकनाथ शिंदे गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सलग चौथ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. काल (बुधवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार हल्ला…

Read More