Headlines

रोटरी क्लब अकोला राजेश्वर सिटीचा शपथविधी:संस्थापक अध्यक्षपदी ॲड. देवाशिष काकड तर सचिवपदी जितेन देशमुख यांची निवड‎

अकोला शहरात नव्याने स्थापन झालेल्या ‘रोटरी क्लब ऑफ अकोला राजेश्वर सिटी’चा शपथग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. रोटरी जिल्हा ३०३० प्रांताचे राज्यपाल रोटेरियन डॉ. राजेश पाटील, माजी जिल्हा राज्यपाल महेश मोकळकर, जिल्हा सचिव श्रीनिवास लेले व साहाय्यक राज्यपाल अनिल चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ अकोला राजेश्वर सिटीच्या संस्थापक अध्यक्षपदी नगरसेवक…

Read More

सिंधी साहित्य संस्था मांडणार फाळणीचा इतिहास:शुक्रवारी कार्यक्रमाचे आयाेजन; नाटकासह डाक्युमेंट्री, देशभक्तीपर गीतेही गाणार‎

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, विदर्भ सिंधी विकास परिषद आणि महिला संघाच्या संयुक्त सहकार्याने ‘विभाजन की विभीषिका’ (फाळणीच्या भीषण वेदनांचा स्मृती दिन) निमित्त एकांकीका, डाक्युमेंट्री व देशभक्तीपर गीत अशा सुमारे अडीच तासाच्या विशेष सांस्कृतिक . यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विदर्भ सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष तुलसी सेतिया म्हणाले, फाळणीच्या वेळी सिंधी समाजाने सहन केलेल्या वेदना आणि त्यांच्या…

Read More

एचआयव्ही रोखण्यासाठी रॅली, पथनाट्य अन् स्पर्धांद्वारे जनजागृती:शहरातून निघाली जनजागृती रॅली, आज रेड रन अन् प्रश्नमंजुषा स्पर्धेचे होणार आयोजन‎

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगरमार्फत बुधवारी शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीच्या मुख्य कार्यक्रमास डॉ. संतोष विधाते जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. सुच . एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी युवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक युवकाने एचआयव्ही एड्सबाबत सविस्तर माहिती प्राप्त केल्यास भविष्यात त्यांच्यापर्यंत एचआयव्ही संसर्ग…

Read More

अकोल्यात मान्सूनच्या मध्यातच 112 टक्के पावसासह श्रावणाचे दमदार स्वागत

श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भंडारदरा परिसरातील डोंगररांगांनी हिरवा शालू पांघरला आहे. अकोले तालुक्यात जूनपासून १२ ऑगस्टपर्यंत ५५१.१ मिमी पाऊस झाला. सामान्य २९६.३ मिमीच्या तुलनेत तो १८६ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत झालेल्या २५४.४ मिमीच्या तुलनेत यंदाचा पाऊस २९६.७ मिमीने अधिक आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात ११६.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. डोंगररांगांवरची ही हिरवाई यंदाच्या दमदार…

Read More

जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ:अनेक दिवसांच्या त्रासानंतर नागरिकांना दिलासा; वाहतूक हाेणार सुलभ‎

बागलाण तालुक्यातील जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या प्रत्यक्ष दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी (दि. ४) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जायखेडा–बिजोटे हा परिसरातील दळणवळणाच्या…

Read More

नांदिनच्या वाडीपिसोळ परिसरातील मातीचा बंधारा दोनच महिन्यात फुटला:काम करताना दगडांची रचना, माती व मजबुतीवरही प्रश्नचिन्ह‎

. बागलाण तालुक्यातील नांदिन येथील वाडीपिसोळ किल्ला परिसरात उभारण्यात आलेला माती बंधारा दोन महिन्यातच फुटला आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बंधाऱ्यासाठी वापरलेली माती, दगडांची रचना व मजबुतीची तांत्रिक तपासणी करून कामासाठी मंजूर निधीचा योग्य वापर झाला का, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कामादरम्यान शेतरस्त्याचे…

Read More

शून्य आयकर विवरणपत्र भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही:भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफियत‎

कर्जावर दुचाकी घेण्यासाठी सामान्य शेतकरी कर्जदार बँकेकडे शून्य आयकर विवरणपत्र सादर करतो. अशा शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शासनाने त्वरित दूर करून कर्जमाफी योजनेत सामील करून घ्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी बुधवारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस व मराठवाडा संयोजक माजी आमदार सुनील राणे यांच्याकडे केली. राणे यांनी बुधवारी सायंकाळी टोणगाव (ता. छत्रपती संभाजीनगर)…

Read More

संभाजीनगर जिल्ह्यात 5.46लाख, राज्यात 1.80 कोटी मतदार वगळले जाऊ शकतात:मराठवाड्यातील 20 लाख मतदारांचा थांगपत्ता नाही

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सध्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) सुरू आहे. त्यात २० लाख ३५ हजार मतदारांचा शोध घेताना बूथ लेव्हल ऑफिसरांची दमछाक होत आहे. स्थलांतरित झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचे डिजिटायझेशन खोळंबले आहे. १७ ऑगस्टपर्यंत हे मतदार आढळले नाही तर त्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती आहे. दरम्यान, राज्यातील ९.७८ कोटीपैकी सुमारे १.८०…

Read More

7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक:शहरात 30 दिवसांत चौथी घटना, शहर लोन माफियांच्या रडारवर

व्यवसाय विस्तारासाठी १५ दिवसांत ७ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून हर्सूल येथील प्रिंटिंग प्रेस उद्योजक प्रकाश रोहिणीकर यांना १ कोटी ९ लाख ८५ हजार १०० रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी ११ ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात ८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्थानिक मध्यस्थ असलेल्या धर्मेंद्र झा (४२) यास अटक करण्यात आली असून…

Read More

तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद:बीड शहरालगत जुन्या वादातून 3 राउंड‎ गोळीबार; दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न‎, एक गंभीर, दोन अटकेत; 5 फरार‎

बीड शहरालगतच्या इमामपूर रस्ता‎परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ‎जुन्या वादाच्या कारणावरून थरारक‎गोळीबाराची घटना घडली. “तू‎आमच्याकडे काय बघतोस?” असा‎जाब विचारत झालेल्या‎बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून‎तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात‎फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला‎असून या प्रकरणी दोन आरोपींना‎गजाआड केले आहे.‎ फिर्यादी शेख मोहम्मद साद (२२, रा.‎जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी‎तक्रार दिली. त्यावरून सफवान खान,‎सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर‎६ ते…

Read More