सत्ता नसताना काँग्रेसची एवढी दादागिरी असेल, तर उद्या काय होईल?:सुप्रीम कोर्टावरील मोर्चावरून भाजपचा राहुल गांधी आणि संजय राऊतांवर घणाघात
देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुठल्यातरी पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात मोर्चा काढला. लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेवर अशा पद्धतीची झुंडशाही आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने केली नव्हती,” असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार…