Headlines

तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष:सातारा परिसरात 3 वर्षांच्या मुलीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, उमानगरमधील घटना; कानाचा तोडला लचका

साताऱ्यातील उमानगरमध्ये मोकाट कुत्र्यांनी शनिवारी (६ जून) घरासमोर खेळणाऱ्या एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. तिच्या कानाचा लचका तोडला. गंभीर जखमी असलेल्या चिमुकलीवर घाटीत उपचार सुरू आहेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सृष्टी निखिल बाहेती (३, रा. उमानगर) असे चिमुकलीचे नाव आहे. गट नंबर १६० मध्ये असलेल्या उमानगर परिसरातील रहिवासी बाहेती कुटुंबातील ही चिमुकली…

Read More

काजवा महोत्सवासाठी बुकिंग अनिवार्य, प्रत्यक्षात नोंदणीच नाही:निसर्गरम्य भंडारदरा परिसर बनला ‘पब’ आणि ‘पार्टी स्पॉट’

भंडारदरा आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सध्या लखलखाटाने उजळून निघाले आहे. काजवा महोत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला हा लखलखाट काजव्यांचा नाही, तर इको सेन्सिटिव्ह झोनचे नियम धाब्यावर बसवून तिथे सुरू असलेल्या मद्यधुंदांच्या पाहुणचाराचा आहे. विद्युत रोषणाई, वाहनांच्या दिव्यांचा झगमगाट, डीजेसह होणाऱ्या पार्ट्या यामुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आल्याचा ‘दिव्य मराठी’ने केलेला हा पर्दाफाश. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांना केराची…

Read More

'लाडक्या बहिणीं'ना मिळणार थकीत 6000 रुपये?:4 महिन्यांचे प्रलंबित हप्ते लवकरच मिळण्याची शक्यता; अधिकृत घोषणेकडे लक्ष

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, ज्या पात्र महिलांच्या बँक खात्यात गेल्या चार महिन्यांपासून दरमहा 1500 रुपयांचे नियमित अनुदान जमा झालेले नाही, त्यांना आता ही संपूर्ण थकीत रक्कम लवकरच एकरकमी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक साहाय्य…

Read More

अखेर नाफेडची बाजार समित्यांमध्ये एंट्री!:कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; आजपासून 2 लाख टन खरेदीला सुरुवात, किती मिळणार दर?

नाशिक जिल्ह्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळावा, नाफेड आणि एनसीसीएफमार्फत थेट बाजार समित्यांमधून खरेदी व्हावी आणि सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांनंतर अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि NCCF मार्फत…

Read More

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी "वासुदेवाची' साद:विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीच्या मोहिमेचा शुभारंभ; प्रभातफेरी काढून जागर

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे एका अनोख्या प्रवेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी चक्क ‘वासुदेवा’चे रूप धारण करून घरोघरी जात, पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे भावनिक आणि प्रभावी आवाहन गायनाच्या माध्यमातून…

Read More

अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:नगरसेवक किशोर मासाळांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; अन्नत्याग करून आत्मकलेश करणार- मासाळ

बारामती नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी नुकतेच एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच, या प्रकरणी किशोर मासाळ यांनी आपल्या नगरसेवक पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे…

Read More

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई:एकाच आठवड्यात 67 लाखांचा गुटखा व अमली पदार्थ जप्त!

नांदेड परिक्षेत्रात चार जिल्ह्यातून गुटखा व अमली पदार्थ विक्री विरोधात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात (1 ते 7 जून) पोलिसांनी मोठी कारवाई करत 67,02,671 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 48 आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर…

Read More

156 पैकी निम्म्याच लोकांवर कारवाई का?:इतर 78 जण आमदार, खासदारांचे मुलं होती का? 'प्रोजेक्ट एक्स'वरून रोहिणी खडसेंचा संताप

आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे 2:30 वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल 107 तरुण आणि 49 तरुणींना ताब्यात घेतले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या,…

Read More

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस:सदर पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही, शेतकऱ्यांनी पेरणीचे घाई करू नये- कृषी विभाग

हिंगोली शहरासह जिल्हाभरात सोमवारी (ता. 8) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र सदर पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हिंगोली जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मृगाच्या पहिल्याच दिवशी पावसाची प्रतिक्षा होती. मृग नक्षत्राच्या…

Read More

नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी

सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह गोव्याचीही विमानसेवा २० जूनपासून पुढील ३ महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी नाइट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ…

Read More