Headlines

लैंगिक अत्याचारातील चिमुकलीवर टणक हत्याराच्या जखमा आढळल्या:नसरापूर प्रकरणातील नराधमाच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ

नसरापूर येथे १ मे रोजी लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. ६५ वर्षीय नराधमाने टणक हत्याराने या जखमा केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. मात्र, भीमराव कांबळे या नराधमाची चौकशी केली असता तो त्या हत्याराबाबत समाधानकारक उत्तरे देत नाही, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात नराधमाच्या हातामध्ये शेवेचा पुडा…

Read More

भातकुलीतील बोरखडी, इस्माइलपुर ठरले:स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर या दोन गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही दोन्ही गावे स्वगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली गावे ठरली आहेत. भारत सरकारच्या जनगणना विभागाने महाराष्ट्र दिनापासून (१ मे) स्वगणना सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. या…

Read More

सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट:सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये चर्चा; तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो- तटकरे

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याचे सांगितले जात असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण…

Read More

अमरावती तालुक्यात पाणंद रस्त्यांची मोजणी सुरू:शेतकऱ्यांच्या वाहतूक समस्येवर तोडगा

अमरावती तालुक्याच्या ग्रामीण भागात वर्षानुवर्षे रखडलेल्या पाणंद रस्त्यांच्या समस्येवर आता महसूल विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या रस्त्यांच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या महसूल अभियानादरम्यान या संदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार, एसडीओ अनिल भटकर आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी वेळापत्रक तयार…

Read More

अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा 'येलो अलर्ट':16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर यापूर्वी ४६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा, कौटुंबिक सहलीचे होते नियोजन

देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी…

Read More

चोपड्यातील पंकज नगर भागात दीड महिन्यांपासून विजेचा लपंडाव:संतप्त नागरिकांनी अभियंत्यांना धरले धारेवर, बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा

चोपडा शहरातील पंकजनगर आणि परिसरातील नागरिक गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विजेच्या भीषण समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. ४५ अंशांच्या घरात पोहोचलेल्या तापमानात वारंवार वीज गुल होत असल्याने आणि विजेच्या दाबात (व्होल्टेज) कमालीची अनियमितता असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज संतप्त नागरिकांनी पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील…

Read More

BMC Zone 5 Drain Cleaning Speed Up; Amit Satam Directs Review in 10 Days

मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना . आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर…

Read More

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सोलापुरातील नगरसेविकांची भेट:विविध व्यवसायांची घेतली माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केले कौतुक

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला सोलापूर जिल्ह्यातील ३२ नगरसेविकांनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यामध्ये उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप जिल्हा अध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस सुधा अल्लीमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण उत्पादनं…

Read More

जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग 'पांढरा हत्ती':अनेक वर्षांपासून विनावापर, त्वरित निर्णय घेण्याची मागणी

शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग प्रकल्प अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. या प्रकल्पावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खर्डेकर यांच्या निवेदनानुसार, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर २००७ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे वापरला गेला नाही. त्यावेळी यांत्रिक पार्किंगबद्दल नागरिकांमध्ये…

Read More