‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे छत्रपती संभाजीनगरात स्वागत:‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ असा प्रवास
प्रतिनिधी |छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे सोमवारी (२७ एप्रिल) शहरात स्वागत करण्यात आले. बजाजनगर येथील ओएसिस चौकात सोहळ्यासाठी नागरिकांसह, महिलांनी गर्दी होती. बजाजनगर येथे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी शहरात यात्रेचे आगमन होताच, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती…